Posts

Showing posts from September, 2020

प्रभाकर मोकळ यांचे निधन...

 माजी नगराध्यक्ष प्रभाकर मोकळ यांचे निधन :  नांदगाव समाजवादी चळवळीचा तारा निखळला ! नांदगावची दिवसेंदिवस समाजवादी चळवळ अस्तंगत पावतेय, या चळवळीतील एक तारा प्रभाकर गंगाधर मोकळ यांच्या निधनाने आज पहाटे निखळला. कोणत्या शब्दात श्रद्धांजली अर्पण करावी हा गहन प्रश्न पडलाय. कारण, मोकळ घराण्याशी आमचे नाते हे चळवळी पुरते मर्यादित नाहीये. ते आमच्या आणि आम्ही त्यांच्या कुटुंबातील एक घटक आहोत. एकच गल्ली, जवळच एकमेकांची घरे. आमच्या कुटुंबात समाजवादी चवळवळीचे बीज मोकळ कुटूंबाने रुजविले.  प्रभाकर मोकळ यांचे वडील गंगाभाऊ मोकळ यांनी आपल्या कार्यकाळात संपूर्ण नांदगाव शहरात समाजवादी चळवळ रुजविली, वाढवली, टिकवली. सुमारे चाळीस वर्षे नांदगाव शहरावर समाजवादी विचाराने, चळवळीने अधिराज्य गाजविले. कार्यकर्त्यांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहून त्याला उभारी देण्याचे काम गंगाभाऊ मोकळ यांनी केले. त्यांचाच वारसा पुढे प्रभाकर मोकळ यांनी चालविला. त्यांनीही आपल्या कामकाजाचा ठसा नांदगाव शहरावर उमटविला. त्यांनीही नांदगावचे नगराध्यक्ष पद भूषविले. त्यांचे काळात नांदगाव शहरात विकासाची अनेक कामे झाली; याहीपेक्षा त्...

गुंजाळसर अभिष्टचिंतन...

 भिका गुंजाळ : भिका ते गुंजाळसर  कष्टप्रद - समाधानी जीवन प्रवास ! भिका हा माझा शाळकरी जिवाभावाचा मित्र. आम्ही दोघांनी व्ही. जे. हायस्कुलमध्ये शाळकरी धडे गिरवले. भिकाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची तर माझी बेताची. त्याच परिस्थितीने भिकाला जगणे शिकविले. भिकाचा विशेष गुण म्हणजे त्याच्यातील नम्रता आणि गुणग्राहकता. शाळेच्या वेळे नंतर काबाडकष्ट करुन जगण्याची लढाई करुन वाटचाल करीत होता. परंतु त्याने चेहऱ्यावर कधीही मनातील दुःख दिसू दिले नाही. सतत हसतमुख असायचा. त्याने ही कला कशी साध्य केली ते आज तागायत कळली नाही. त्याचाच उपयोग त्याला झाला. परिस्थिती बदलली तरी भिकाच्या स्वभावात काडीमात्र फरक झाला नाही. जेथे शिकला तेथेच शिकवायला लागला, भिकाचा तो गुंजाळसर झाला. समाजात स्वतःचे एक वेगळे स्थान मिळविले. त्याचा मला रास्त अभिमान आहे. त्याचा आज वाढदिवस आहे; त्याचे अभिष्टचिंतन करतांना त्याच्या कर्तृत्वाला उजाळा द्यावा, दुसऱ्याला त्यातून प्रेरणा मिळावी, हा खरा आजचा मूळ हेतू आहे.  भिका आणि मी एकाच वेळी अकरावी पास झालो. पुढील शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती आड येत होती. त्याचवेळी व्ही. जे. हा...