Posts

Showing posts from June, 2019

विजय रिंढे

मरणावर `विजय` मिळविणारा `किमया`गार ! व्यसनाने त्याची वाटचाल मरणाच्या दिशेने दिवसागणिक पुढे सरकत होती. त्याच्या संदर्भात रोज एक नवी अफवा येत होती. त्याचकाळात त्याच्या वडिलांची तब्बेत बरी नव्हती. तेही पुण्याला उपचार घेत होते. त्याच्या पहिले त्याचे वडील एक्झिट घेतील असा कोणी विचारही केला नव्हता. एक दिवस पुण्याहून निधनाचा निरोप आला. इकडे गावाकडची  मंडळी त्याच्या घरी जमू लागली. डेडबॉडी नांदगावला कधी आणणार याची विचारपूस सुरु झाली. त्याच्या वडिलांना गावातील लोक रिंढेमामा म्हणायचे. रुग्णवाहिका नांदगावी कधी पोचेल यासाठी फोन सुरु झाले. मामा तुम्ही कुठपर्यंत आले, असे विचारू लागले. प्रत्येक फोन तो उचलत होता. त्याला जाणीव झाली. आपणच गेलो, अशी भावना लोकांची झाली आहे. त्याच्या दुखःवर ती मोठी डागणी होती. जिवंतपणी तो आपल्या मृत्यूची खबर स्वतः अनुभवत होता. निधन वडिलांचे झाले होते, लोक तोच मेल्याचे समजत होते. तरुणपणी मुलगा मेला, रिंढे मामावर दुखःचा डोंगर कोसळला असे म्हणून सर्वचजण हळळत होते. त्यात माझीही भर होती. मलाही वाटले विजू अकाली गेला. व्यसनाने त्याला संपविले. परंतु वास्तव वेगळे होते. त्याच्या...