शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे यांच्या `शिवाश्रम` प्रकल्पास हातभार लावू या ! शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे हे सध्या शिवाश्रम प्रकल्पाचे निर्मितीसाठी झपाटले आहे. आपल्या कार्यक्रमातील बिदागीचा बहुतांशी भाग या प्रकल्पासाठी खर्च करीत आहे. शिवाश्रम प्रकल्पाचे माध्यमातून अपंग, वृद्ध, कलावंत यांचे उदरनिर्वाहासाठी निवासी व्यवस्था करणार आहेत. आपल्या बिरादरांना स्वाभिमानाने जगता यावे हा दृष्टीकोन डॉ. तनपुरे यांचा आहे. डॉ. तनपुरे हे अपंग आहे. त्यांनी आपली मराठमोळी कला सातासमुद्रापार पोचविली आहे. डॉ. तनपुरे यांनी शारीरिक व आर्थिक परिस्थितीवर मात करून मराठी संगीत शिवायनच्या माध्यमातून अटकेपार झेंडा फडकाविला आहे. परिस्थितीच्या यातना त्यांनी भोगल्या आहेत. त्या आपल्या सहकारी बांधवांना भोगाव्या लागू नयेत, अशी त्यांची आंतरिक इच्छा आहे. त्यासाठी तब्बेतीची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांचे हे कार्य अलौकिक होय. त्यांच्या या कार्याचे आम्हाला पत्रकारीतेबरोबरच लोककलेचे अभ्यासक म्हणून नेहमीच अप्रूप वाटले आहे. डॉ. विजय तनपुरे यांच्या पहाडी आवाजाचे गारुड आमच्या मनावर नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मरा...