विजुमामा आहेर : स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...
विजूमामा आहेर : आठवणीतील एक मनस्वी व्यक्तिमत्व ! विजूमामा आहेर यांनी १४ एप्रिल २००३ रोजी या जगाचा निरोप घेतला. आपल्यातून जाऊन आज जवळपास १७ वर्षे झालीत. नांदगाव तालुक्यातील नव्हेतर नाशिक जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा दबदबा होता. नांदगाव तालुक्यातील राजकारणात तर त्यांच्याशिवाय वर्तुळच पूर्ण होत नव्हते. कोणाला निवडायचे आणि कोणाला पाडायचे याचे गणित त्यांचे पक्के असायचे. नांदगाव तालुक्यातील राजकारणाच्या पहिल्या पिढीनंतर दुसऱ्या पिढीचे ते प्रमुख घटक होते. वडील शिवराम आहेर तसेच जेष्ठ बंधू गंगाधरअण्णा यांचा मोठा वारसा त्यांचे पाठीशी होता. सनद असूनही वकिलीत त्यांचे मन रमलेच नाही. विजूमामा खरेतर माणसाळलेला माणूस. त्यांचेठायी राजकारण आणि समाजकारण बेमालूम सरमिसळ होती. विजूमामाच्या स्वभावाचा थांगपत्ता लागणे अनेक राजकारण्यांच्या दृष्टीने अवघड असायचे. मात्र सर्वसामान्य माणसांच्या घोळका त्यांच्या समवेत असायचा. खरेतर तेच त्यांचे बलस्थान होते. मामाकडे काम घेऊन जाणारा काम नाही झालेतरी नाराज नसायचा. मामाचे कामाचे एक खास वैशिष्ट्य होते. काही कामांच्या बाबतीत काम होणार नाही हे माहित असूनही त...