राजरोसपणे लाचेचे दर ठरले पाहिजे का? ``ना खावूंगा ना खाने दुंगा !`` कोणी कोणास म्हटले, असा प्रश्न विचारला तर चुलीवर भाकरी थापणारी बाईसुद्धा पटकन सांगेल पंतप्रधान मोदी; पण कोणास? असे विचारले तर सगळेच बुचकळ्यात पडतील. पूर्वी जे खात होते ते आजही खातच आहे. भ्रष्टाचार एक प्रवृत्ती बनली आहे. ती खाणाराच्या नसानसात भिनली आहे. ती सहजी नष्ट होईल अशी लक्षणे आजतरी दिसून येत नाही. दिल्या-घेतल्या शिवाय काम होत नाही अशी एक लोकभावना बहुतांशी समाजात बळावली आहे. त्याचे प्रत्येंतर नेहमीच येत आहे. मल्ल्या, ललित, नीरव मोदी देशाला लुटून परदेशात पळाले. प्रशासकीय पातळीवर कुठे ना कुठे रोजच भ्रष्टाचार सुरु आहे. सापडला तो चोर ठरत आहे. लहान चोर, मोठा चोर असा फरक काही करतील. परंतु चोर तो चोरच ! खरे तर हे नमनालाच घडाभर तेल झाले. मूळ कथानक जरा वेगळे आहे. कथा नांदगावची आहे. भ्रष्टाचार-लाचलुचपतची आहे. २० मार्च रोजी रंगेहात पकडल्याची आहे. चोर सापडला आहे. चोर नाही आरोपी कारण गुन्हा सिध्द होईपर्यंत तो आरोपीच असतो. त्याला सजा होईल की काय ते मात्र न्यायालयात ठरेल. आजवर लाचलुचपत खात्यात तक्रारदार पीडित नागरिक ...