Posts

Showing posts from July, 2020
Image
नरेशचे अभिष्टचिंतन : पत्रकारितेचा निष्ठेने जपलेला वारसा ! मनमाड आणि जनश्रद्धा हे समीकरण दीर्घ काळापासून रुढ झाले आहे. पत्रकारिता आणि प्रामाणिकपणा ह्या दोन गोष्टी आज जरा संशयास्पद ठरत आहे. 'विकाऊ मीडिया' ही एक शिवीच झाली आहे. यात सर्व प्रकारचा मीडिया आला. थोडेच सन्माननीय अपवाद आहेत. त्यांच्याप्रती आदर आहे. सन्माननीय आदराच्या या जातकुळीत दिवंगत कांतीलाल गुजराथी व नरेश गुजराथी यांची सुमारे चार तपाहून अधिकची पत्रकारिता टिकून आहे. कांतीलालजी गेल्यानंतर नरेशने पत्रकारितेची परंपरा टिकवून ठेवली म्हणण्यापेक्षा वाढविली, वाचकात रुजविली. टिकविणे आणि रुजविणे ही बाब खूप कठीण आहे. परंतु, ही बाब  जनश्रद्धाच्या माध्यमातून अनेक संकटांवर मात करुन कांतीलालजी यांचेनंतर नरेशने टिकविली आहे. मनमाडसारख्या कामगारांच्या शहरात पत्रकारिता करणे खूपच अवघड आहे. बायस पत्रकारिता न करता सगळ्या गटातटांना समान न्याय देत, तसेच चुकीला चूक म्हणत, चांगल्याला चांगले म्हणत गुजराथी यांनी आपली पत्रकारिता केली, म्हणून ते अनेकांच्या पसंतीस उतरले. आजही मानसन्मानाने टिकून आहेत. या क्षेत्रातील बाजार बुनग्यांबद्दल न लिहिलेच ...
लोकशाहीर विठ्ठल उमप : जातिवंत कलावंत ! लोकशाहीर विठ्ठल उमप यांची यांची आज जयंती, त्यानिमित्त सर्वप्रथम विनम्र अभिवादन ! लोकशाहीर विठ्ठलदादा यांना पाहण्याचा, ऐकण्याचा, प्रत्यक्ष संवादाचा योग आलाय, हे मी माझे भाग्य समजतो. तसे रेडिओ, टीव्हीवर त्यांना हजारदा ऐकले, पाहिले. प्रत्यक्ष भेट फक्त एकदा-दोनदाच झाली. नाशिक येथील अखिल भारतीय शाहीर परिषदेच्या अधिवेशनात पहिल्यांदा त्यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यांनतर अलिकडे साधारणतः दहाएक वर्षांपूर्वी त्यांची माझी थेट भेट नांदगाव येथील माझ्या 'समर्पित'च्या कार्यालयातच झाली. अखिल भारतीय शाहीर परिषदेचे माझे मोठे बंधू रमेश कदम हे संस्थापक असल्याने महाराष्ट्रातील बहुतांशी शाहिरांशी कौटुंबिक संबंध आहेत. अनेक शाहीर नांदगाव येथे आमचेकडे येऊन गेले आहेत. त्यातील विठ्ठलदादा यांची भेट अविस्मरणीय होय. ती आजही तितकीच ताजी आहे. विठ्ठलदादा नांदगावला शासकीय एड्सच्या विषयी जनजागृती कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. त्याची पूर्वकल्पना आम्हाला नव्हती. अचानक भेट आश्चर्य चकित करणारी होती. मी माझ्या कार्यालयात यथोचित सन्मान केला. यावेळी माझा मित्र परिवार उपस्थि...
शशिकांत नागरे : साखळीतील एक कडी निखळली ! अंधारीचा शशिकांत अंधाराच्या दिशेने कायमचा निघून गेला. आमच्या मित्रत्वाच्या साखळीतील एक कडी आज दि. २८ जून२०२० रोजी निखळली. बरोबरीचा मित्र जेव्हा हे जग सोडून जातोना तेव्हा ते दुःख वेदनेपलिकडचे असते. ते शब्दाच्या कवेत मावत नाही. नियती किती निष्ठूर असते, दुःखाच्या वेदनेवर शेवटी शब्दांचीच फुंकर मारावी लागते. दुःखाचा आकार कसा मोजावा, डोंगराएव्हढा की आभाळाएव्हढा. माणूस गेल्यानंतर - मेल्यानंतर, दुःखाचा डोंगर कोसळला, असे आपण म्हणतो. खरे तर माणसाने हा इहलोक सोडल्यानंतर त्याचे ठेवलेले नाव तेथेच थांबते. बॉडीला बाहेर काढा, बॉडी कुठेय, आली का, असे शब्दप्रयोग सुरु होतात. आज आमच्याही शशिकांत नागरे नावाच्या मित्राची नावाऐवजी बॉडी झाली. आता त्याला मूठमाती दिली जाईल. हे ऐकायला खूप जड जातेय. शेवटी वास्तव स्वीकारावेच लागते. एक दिवस एक-एक करुन सर्वांना या दिशेने जावे लागणार आहे, हे जरी खरे असले तरी मानवी मनाला भावना आहेत. आज आपला मित्र आपल्यात नाही असे समजताच डोळ्यातून अश्रू आपोआप ओघळू लागतात. अश्रू पुसून मित्रत्वाच्या नात्याने मी काही आठवणींच्या भावना व्यक्त करतो...
डी. बी. महाजन : अनाथांच्या माईंचा लाडका लेक ! 'अनाथांची आई' या अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचे जीवनावर लिहिलेल्या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक, आणि आमचे सन्मित्र डी. बी. महाजन यांचा आज वाढदिवस. यानिमित्त सर्वप्रथम त्यांचे हार्दिक अभिष्टचिंतन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडावूनच्या काळात मी माझे मित्र तथा इतर अनेकांवर प्रासंगिक लेखन केले आहे. हेतू हा की त्या-त्या व्यक्तित्वाचे विविध पैलू समाजापुढे ठेवावे, त्यातून चांगले-वाईट वाचकांनी निवडावे, वाचावे, आचरणात आणावे किंवा न पटल्यास सोडून द्यावे. सगळेच काही समान विचारधारेचे असतात असेही नाही. हे मला मान्यच आहे. मी म्हणतो तीच पूर्व असा माझा कधीही आग्रही राहिलेला नाही. यात एक मजेशीर प्रकारही अनुभवास आलाय की काही पटूनही मौन पाळतात, काहींना न पटले तर ते स्पष्टपणे व्यक्तही होत नाही. थोडे विषयांतर झाले. बरे असो. माझे जेष्ठमित्र डी. बी. महाजन हे काही प्रथितयश लेखक नव्हते; परंतु अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांचे सहवासातील काही प्रसंग त्यांनी शब्दबद्ध केले. त्याचे 'अनाथांची आई' या पुस्तकात रुपांतर झाले. त्याने वाचकांच्या हृदयाचा ठाव ...
अर्जून कोकाटे : मूकबधीरांच्या 'मायबोली'चा प्रणेता ! अर्जून एक सच्चा राष्ट्र सेवा दल सैनिक. तेव्हढाच आमचा सच्चा मित्र. मी आणि अर्जून एका समान विचारधारेतून एकत्र आलो. राजकारणात व समाजकारणात अनेक वादळे आली; महापुरे येतात जातात परंतु  लव्हाळे जागेवरच तग धरुन राहतात, तसे आम्ही आजही समाजवादी विचारसरणी बरोबर तग धरुन आहोत. अर्जून मूळचा धडपड्या. त्यात त्याला येवल्यात प्रा. रणजीत परदेशीसारखा मार्गदर्शक लाभला. त्यातून अर्जूनच्या खऱ्या कार्यकर्त्याचा पिंड घडला. प्रा. रणजीत परदेशी राष्ट्र सेवा दलाचे नाशिक जिल्हा प्रमुख झाले; तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली. त्यांच्या नसानसात समतेचे बीज रुजविले. अर्जून कोकाटे यात आघाडीवर होता. प्रा. रणजीत विचारधारेच्या बाबतीत खूपच आक्रमक. फर्डे वक्ते असल्याने त्यांनी नाशिक जिल्ह्यातील राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण केले. त्यात अशोक परदेशी, गोपाळ पाटील, अंजू उगावकर, अर्जून कोकाटे, विक्रम गायकवाड, प्रभाकर मुराळकर, मनोहर पवार, पुष्पा चोरडिया, पुष्पा बागुल याचबरोबर नांदगावमधून कचेश्वर बारसे यांचे नेतृत्वाखालील आम्ह...
शंकर विसपुते : नाना कळा(कला) असलेला पारदर्शी छायाचित्रकार ! शंकरचे प्रचलित टोपण नाव नाना. त्याची खरी ओळख नाना हीच आहे. नाना कोणत्याही कामाला ना म्हटला नाही, आणि लाजलाही नाही. त्याने बीनलाज्या काम कधी केले नाही. नानाची जडणघडण माझ्या डोळ्यादेखतची आहे. परिस्थितीशी संघर्ष करीत त्याची सुरवात झाली, तो आजही झगडतोच आहे. त्याचे दुःख कधी त्याच्या चेहऱ्यावर दिसले नाही. परिस्थितीशी सतत त्याला दोन हात करावे लागत आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तर त्याची परिस्थिती अधिकच बिकट झाली. नाना कण्हतकुथत बसला नाही. लोकडाऊनच्या काळात लग्नसराई थांबल्यात जमा झाली. फोटोग्राफीच्या धंद्याला अवकळा आली. घरखर्च थांबला नाही. कमावणारा फक्त नाना एकटाच. त्याने कोणाकडे हात न पसरता आपल्या मोटरसायकलला कॅमेराऐवजी दोन कॅरेट जोडले. त्यात भाजीपाला, टरबूज-खरबूज भरुन तो धंद्याची कोणतीही लाज न बाळगता गल्लीबोळात, खेडोपाडी विकू लागला. तसा तो प्रेस फोटोग्राफर. त्याचीच ही कथा त्याच्या फोटोसह पेपरात छापून आली. माझे मन काहीसे हेलावले, परंतु नानाचा मला रास्त-सार्थ अभिमानही वाटला. नानाने कष्टाला कधी नाकारले नाही. जगण्याची त्याची धडपड त्...