लोककवी वामनदादा कर्डक : मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा ! काही माणसं जन्माला येताच, त्यांच्या भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा असतो. तरीही अशा माणसात माणसं चेतविण्याची ऊर्जा येते कोठून? उपाशी पोटी माणूस क्रांतीची भाषा बोलू लागतो, हे मात्र काही माणसांच्या जीवन चरित्राकडे पाहिले तर लक्षात येते. अन्यायाची चीड त्यांच्या नसानसात भिनलेली असते. त्यांचे शब्दच अंगार होतात आणि ते व्यवस्थेलाच जाब विचारु लागतात. वामनदादा कर्डक अशांपैकी एक होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच त्यांचे प्रेरणाश्रोत म्हणण्यापेक्षा जीवनगाणे होते. 'उद्धरली कोटी कुळे; भीमा तुझ्या जन्मामुळे', एका ओळीत वामनदादा यांनी दीनदलित, उपेक्षितांच्या जगण्याचे सार सांगितले. तसेच अण्णाभाऊ साठे म्हणतात 'जग बदल घालूनी घाव, सांगून गेले भीमराव', यातून माझ्या मनाला एक प्रश्न नेहमी सतावतो, लोककवी वामनदादा कर्डक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भाऊ बापू मांग ही अल्पशिक्षित पण लोकविलक्षण माणसे, यांचेत एवढी प्रतिभा आली कोठून. कदाचित या लोकांच्या भुकेआड शब्द-भावभावना दडलेली असावी. वामनदादा शाहिरी जलसे, अण्ण...
Posts
Showing posts from May, 2020
- Get link
- X
- Other Apps
स्मृतीचा जागर : आईने चेटकिणीशी पंगा घेतला होता ! सखुबाई नामदेव कदम : १३ मे १९९८ रोजी माझी आई अखेरच्या अनंताच्या प्रवासाला निघून गेली. ही जखम आजही भळभळते. आईसाठी प्रत्येकाचा मनाचा कोपरा तिच्या बटव्या सारखा भरलेलाच असतो. स्मृतींचा हा खजाना कधीच रिता होत नाही. तुमचा तसाच माझाही. परंतु, प्रत्येकाच्या आईची एक खासीयत असते. तशीच माझ्याही आईची होती. जेमतेम पहिली इयत्ता शिकलेली, पण ती अडाणी अजिबात नव्हती. मायेच्या ओलाव्या बरोबरच खेड्यातील रांगडेपणही तिच्या ठायी होते. गरिबीचे चटके तिच्याच वाट्याला आले होते असे नाही. परंतु ती कणखर आणि दृढनिश्चयी होती. समज आणि शिक्षण याचे अंतर तिला चांगलेच कळत होते. आपल्या मुलांना शिक्षणाशिवाय भवितव्य नाही, याबाबत तिची भूमिका ठाम होती. कदाचित वडील काहीसे बेफिकीर असल्यामुळे तिला तशी जाणीव झाली होती. नांदगाव तालुक्यातील भवरी या खेड्यात तिचा जन्म झाला. आईचे वडील वारकरी पंथाचे होते. घरात वशट (नॉनव्हेज) वर्ज्य होते. माझ्या मामांनी मरेपर्यंत मांसाहार केला नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांची परंपरा जपली होती. आईचा विवाह नामदेव नावाच्या माझ्या बापाशी झाला. माझ्या बापाची...
- Get link
- X
- Other Apps
महेंद्र बोरसे : बहुगुणी व्यक्तिमत्वाचा मित्र ! महेंद्र बोरसे माझा मित्र आहे. मैत्री असा प्रांत आहे. त्याला फारशा सीमारेषांचे बंधन असू नये, या ठाम मताचा मी आहे. मैत्रीच्या धाग्यात विविध प्रकारची गुंफण असते. त्याची वीण घट्ट असली की ती दीर्घकाळ टिकते. मैत्रीबाबत माजी मंत्री हेमंतनाना देशमुख यांनी फार छान विवेचन नांदगाव येथील एका भाषणात केले होते. ते माझ्या मनावर आजही कोरले गेले आहे. ते म्हणाले, मैत्री या नात्याला कोणतीही बाधा नसते. ज्या दिवशी बाधा निर्माण होते तेथेच ती संपते. माणसाच्या इतर प्रत्येक नात्यात बाधा असली तरी ते जन्माने, नात्याने कधीही तुटत नाही. मला हे त्याचे लॉजिक भावले इतकेच नव्हेतर मी ते प्रत्यक्ष अनुभवतोय. माझा मित्र परिवार हा बहुगुणी तसाच बहुढंगी आहे. प्रत्येक माणसात एक वेगळे वैशिष्ट्य असते. ते दुसऱ्याकडे नसते. त्यातील चांगले ते वेचत चालावे, असा माझा मूळ स्वभाव. कुणाला आवडो अथवा ना आवडो; जिसकी उसकी पसंद. महेंद्र बोरसे माझ्या मैत्रीच्या नात्यात बसणारा बहुगुणी, बहुरंगी मित्र आहे. मला त्याचे व्यक्तिमत्व मनापासून भावते. तसे पाहिले तर माणूस हा गुणदोषाचा पुतळा असतो. कोण पर...
- Get link
- X
- Other Apps
कोरोना : गरीबच रस्त्यावर तडफडून मरतोय ! भूत, वर्तमान, भविष्य या काळात मन भटकत असते. त्यात चांगली, वाईट, बरी अशी स्थिती असते. म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती. माणसाला वाचा आणि भावना ही खास देणगी नियंत्याकडून मिळाली आहे. त्या व्यक्त करण्यासाठी शब्द दिले. त्यात दुःख, राग, लोभ, आनंद हे गुणदोष सामील झाले. माणसाला स्मृती हा जसा गुण मिळाला; तसेच विस्मृती ही सुद्धा मोठी देण आहे. चांगले आठवणे हे मनाला रिझवते; तर वाईट विसरणे हे सुद्धा मनाला शांत ठेवते. जगणे मरणे हे एक श्वासाचे अंतर आहे. रिकामे मन हे सैतानाचे घर आहे, असे म्हटले गेले आहे. कोरोनाच्या या काळात मन सैरभैर झालेय. आणि सैतान आ वासून रस्त्यात उभा आहे. गरीब रोज रस्त्यावर तडफडून मरतोय. माणुसकीची परीक्षा होतेय. माणसं गोंधळली आहे. परंतु त्याहून अधिक शासक गोंधळले आहे. कुणी हेकेखोर आहे तर कुणी दुबळे. निसर्गाने-किटाणूने मारले, राजाने झोडले (पार्श्वभागावर दंडुक्याचा प्रहार) सांगायचे कुणाला. मुकी बिचारी कुणीही हाका, अशी अवस्था झालीय. माझं मन असल्या विचारात सध्या भटकत आहे. आला दिवस पुढे ढकलत आहे. याकाळात अवस्था द्विधा झालीय. रोज टीव्ही, फेसब...
- Get link
- X
- Other Apps
संतोषअण्णा एक मर्द कार्यकर्ता ! संतोष मधुकर गुप्ता : नांदगाव शहरात गुप्ता कंपनीची इन मीन साडे तीन घरे. त्या घराला घरपण मिळवून देणे, ते इतर समाजात रुजविणे आणि त्याला समाज मान्यता मिळविणे हे तसे खूप अवघड काम. आपल्या कार्यकर्तृत्वाने हे स्थान गुप्ता कंपनीने मिळविले आहे. गुप्ता वाड्याला इतिहास आहे. परंतु, शंकरलाला ही मंडळी ह्या वाड्या बाहेरची. डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात शंकरलाला यांचे किराणा दुकान आणि याच पंगतीत माझ्या वडिलांचे दुकान होते. वडिलांनी एक आणा हातात टेकविला की, मी लालाच्या दुकानातून गोळ्या बिस्कीट घेत असे. नारायण, मधुकर, सुधाकर, सुभाष ही भावंडे ह्या दुकानात बसत. नंतर नारायण शेठ यांनी रेल्वे विभागात वेगळे दुकान टाकले. या जुन्या दुकानावर मधुकर शेठच बसू लागले. सुधाकर बाजारहाट करायचे. सुभाष काकाने स्टेशनरी दुकान टाकले. अशाप्रकारे गुप्ता कंपनीचा विस्तार वाढत गेला. मूळ झाडाच्या अनेक फांद्या झाल्या. गुप्ता कंपनीचे वैशिष्ट्ये असे की त्यांनी व्यवसायाबरोबर समाजकारणात मूळ रुजविले. नांदगाव शहर हे समाजवाद्यांचा बालेकिल्ला. त्यामुळे शहरात समाजवादी विचारवंतानी हजेरी लावली. त्यातून अनेक...
- Get link
- X
- Other Apps
सुरेश आणि सलीम दोन व्यक्तिमत्व ! सुरेश शेळके आणि सलीम शेख या दोन मित्रांचा आज वाढदिवस. यातील पहिला सुरेश हा राजकारण जाणणारा आणि प्रत्यक्ष निवडणुका लढवून करणारा, तसेच त्यावर लिहिणाराही. दुसरा संपूर्ण राजकारण जाणणारा परंतु प्रत्यक्ष त्यात न पडणारा. जो राजकारण करतो त्याला पाडणे आणि पडणे माहित असते. न करणारा मात्र काठावर राहून नरो व कुंजरो, अशी भूमिका घेणारा असतो. हे झाले राजकारणा बाबत. सुरेश आणि सलीम मध्ये एक साम्य आहे. ते जगण्यासाठी आजही प्रामाणिकपणे झगडताहेत. सुरेशने यासाठी पत्रकारितेचा मार्ग पत्करला आहे. सलीम मनमाडला खारी-पावच्या बेकरीत डे नाईट रोजंदारी करीत आहे. हे दोघे सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व (तथाकथित लोकप्रतिनिधी नाही) करतात. ही माणसे त्यांच्या प्रामाणिक प्रवृत्तीमुळे मला मनापासून भावतात. थोरा-मोठ्यांसाठी कुणीही मोठा बुके घेऊन जाईल. परंतु, जे तळागाळातल्या माणसांचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी प्रेमाचे दोन शब्दही पुरेसे असतात. सुरेश शेळकेचा मोठाभाऊ नंदू शेळके हा अशोक रसाळ यांच्या तालमीत घडलेला हाडाचा शिवसैनिक. खरेतर त्या काळात नाशिक जिल्ह्यात शिवसेना...