स्मृतीचा जागर : आईने चेटकिणीशी पंगा घेतला होता !
सखुबाई नामदेव कदम : १३ मे १९९८ रोजी माझी आई अखेरच्या अनंताच्या प्रवासाला निघून गेली. ही जखम आजही भळभळते. आईसाठी प्रत्येकाचा मनाचा कोपरा तिच्या बटव्या सारखा भरलेलाच असतो. स्मृतींचा हा खजाना कधीच रिता होत नाही. तुमचा तसाच माझाही. परंतु, प्रत्येकाच्या आईची एक खासीयत असते. तशीच माझ्याही आईची होती. जेमतेम पहिली इयत्ता शिकलेली, पण ती अडाणी अजिबात नव्हती. मायेच्या ओलाव्या बरोबरच खेड्यातील रांगडेपणही तिच्या ठायी होते. गरिबीचे चटके तिच्याच वाट्याला आले होते असे नाही. परंतु ती कणखर आणि दृढनिश्चयी होती. समज आणि शिक्षण याचे अंतर तिला चांगलेच कळत होते. आपल्या मुलांना शिक्षणाशिवाय भवितव्य नाही, याबाबत तिची भूमिका ठाम होती. कदाचित वडील काहीसे बेफिकीर असल्यामुळे तिला तशी जाणीव झाली होती.
नांदगाव तालुक्यातील भवरी या खेड्यात तिचा जन्म झाला. आईचे वडील वारकरी पंथाचे होते. घरात वशट (नॉनव्हेज) वर्ज्य होते. माझ्या मामांनी मरेपर्यंत मांसाहार केला नाही. त्यांनी त्यांच्या वडिलांची परंपरा जपली होती. आईचा विवाह नामदेव नावाच्या माझ्या बापाशी झाला. माझ्या बापाची कहाणी जरा वेगळीच होती. त्यांच्या आईला पहिल्या नवऱ्यापासून मुलगा होता. तिने त्याकाळात विधवा विवाह केला होता. त्यानंतर तिला माझा बाप नामदेव व त्यांचा एक भाऊ अशी दोन मुले झाली. परिस्थिती हलाखीचीच. माझा बाप पारश्याच्या घरी पाणी भरणे, झाडझटक करणे ही कामे करायचा. ब्रिटिशकाळात युरोपियन व पारशी यांची संख्या नांदगाव शहरात लक्षणीय होती. त्यांच्या दोन स्मशानभूमी होत्या. त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आजही शहरात आहे. होतकरु गरीब मुलगा म्हणून आईच्या वडिलांनी तिचा विवाह करुन दिला. मला माझा बाप आणि चुलता या व्यतिरिक्त त्यांची खानदान माहित नाही.
मात्र माझी आई सखुबाई हिचे गणगोत मोठे होते. वारकरी तसेच ती विचारी घरातून आलेली होती. ते संस्कार तीने आयुष्यभर जपले. तीच खरी शिदोरी आमच्या भावंडांना लाभली. आयुष्यभर पुरेल एवढीच नव्हेतर पुढच्याही पिढ्यांना पुरुन उरेल इतकी आहे. आमचं खटलं मोठं होतं. चार भाऊ व तीन बहिणी असं. घरतर कोंबडीच्या खुरड्यासारखं आणि तेही रुपया भाड्याचे होते. मुस्लीम कुटुंबाचे होते. त्यांनी नंतर भाडेही कधी घेतले नाही. त्यांचे आमचे नाते जीवाभावाचे होते. त्यामुळे दिवाळी आणि ईद सारखीच होती. माझे आई-वडील, एक भाऊ हे जग सोडून गेले तेव्हा बाबूभाई कासम शेख हा आमचा घरमालक-सख्खाशेजारी ढसाढसा रडत होता. त्याला आमच्या कुटुंबात मोठ्या भावाचा दर्जा होता. त्याच्या तिसऱ्या पिढीनेही हे संबंध कायम ठेवले आहे. आज बाबूभाई हयात नाही. त्याची मुले नगरला आहेत, ते आजही सुख-दुःखात सहभागी होतात. 'आपण तसे शेजारी' हा पहिला धडा आमच्या आईने आम्हाला गिरवला होता.
माझे मामा नारायण सोनवणे हे आमच्या आईमुळे नांदगावला आले. त्यांच्याही जडणघडणीत आईचाच वाटा मोठा होता. मामांना नांदगाव येथे चांगला विचारी मित्र परिवार लाभला. माजी नगराध्यक्ष गंगाभाऊ मोकळ हे त्यांचे गुरु. ते आम्ही एकाच गल्लीत राहायचो. मामाला त्यांच्यामुळे राष्ट्र सेवा दलाची शिकवण मिळाली. आईलाही सेवा दल हे चांगले संस्कार करणारे केंद्र आहे, याची पुरेपूर जाणीव होती. काळ आणि काळाची पाऊले तिला चांगली कळत होती. आम्ही भावंडे मामा पाठोपाठ काही कळायच्या आत राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जात होतो. तेथील शाखेची शिस्त आणि संस्कार आजही आमच्या अंगात भिनलेले आहेत. खरे तर आईचेच हे उपकार होते. आईच आमची असली गुरु होती.
शिक्षण आणि संस्कार तिला चांगलेच कळत होते. इतकेच काय श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरकही ती पुरता जाणून होती. आईचा मामेभाऊ भिका त्याकाळात पदवीधर झाला होता. नाशिकला चांगल्या नोकरीस होता. तो नाशिकहून आला की आमच्याकडे थांबून निमगावला जायचा. ते आईचे आजोळ होते. त्याची आई म्हणजे आमच्या आईची मामी मोठी जहाल बाई होती. तिला जीत भुताळीण म्हटले जायचे. आईच्या मामीला अघोरी विद्या शिकायची होती. त्यासाठी तिने मुलाला कळसावर देण्याचे ठरविले. हा प्रकार अत्यंत अघोरी होता. भिकाच्या आईची इच्छा भिका मोडू शकत नव्हता. त्याला कशी मोहिनी घातली होती ते आजही कळायला मार्ग नाही. आम्ही लहान होतो. एक दिवस भिका नाशिकहून नांदगाव येथे आला. माझ्या आईजवळ मोठ्याने रडू लागला. आईला तो मोठी मामेबहीण म्हणून बाई म्हणायचा. बाई तुला मी आज अखेरचा भेटायला आलो. आईने त्याला विचारले, तेव्हा त्याने त्याच्या आईची इच्छा सांगितली. माझ्या आईचा संताप अनावर झाला. तिने त्याला सांगितले मी तुझ्या बरोबर उद्या येते. आई सोबत गेली. मालेगाव येथे त्याच्यासाठी गुढी घेण्यात आली. झाड-गाडीवान, अंगारा-धुपरा असा कार्यक्रम सुरु झाला. जे हे प्रकार जाणतात त्यांना ही भाषा व शब्द परिचित आहे. त्याच्या सोबत माझ्या आईला पाहिल्यावर 'रांडमेली वनी वं', अशा शिव्यांची लाखोली तिला अंगात येऊन वाहण्यात आली. आईने सर्वप्रकार पाहिला. आणि स्पष्ट शब्दात सुनावले, तुमची चेटूक-चाटूक माझ्यावर चालवा. ह्या मुलाला कशाला कळसावर देता. आईने भिकाला त्यांच्या तावडीतून सोडवून पुन्हा नांदगावला आणले. नंतर भिकाला प्रचंड मानसिक धक्का बसला. तो आजारी पडला. त्यातच त्याचा शेवट झाला. मात्र चेटकीण मामी माझ्या आईचे काही बिघाडू शकली नाही. अशी माझी आई मनाची खंबीर होती तिने चेटकिणीशीही पंगा घेतला होता.
नामदेव कृष्णाजी कदम हा माझा बाप. तसा मेहनती, कष्टाळू पण कमालीचा बेफिकीर. बापाने ढोर मेहनत केली. सुरवातीला कष्टाचे चीज झाले. दोन पैसे खिशात यायला लागले. त्यातून मित्र परिवार जमला. राजकारणाचे त्याचबरोबर दारूचे व्यसन जडले. नगरपालिकेत एकदा निवडूनही आले. त्याचबरोबर अधोगतीला सुरवात झाली. जे इतरांचे होते तेच आमच्याही घराचे झाले. दारिद्र्य जणू आमच्या पाचवीलाच पुजले होते.
सुरेश हा मोठा भाऊ आमचा आईने तिच्या मोठ्या बहिणीकडे पाठवून दिला. त्याच्या मनिऑर्डरवर घर कसेबसे चालू लागले. आम्ही भावंडे शिक्षणाकडे लक्ष देऊ लागलो. शब्दांचा लळा लागला. विचार सोबतीला होतेच. हळूहळू आम्हाला दिशा गवसू लागली. त्यानंतरचा रमेश हा भाऊ लेखनाकडे वळला. त्याच्या लेखणीत दम होता. अक्षर जादुई होते. मराठा या दैनिकात पत्रकारिता करु लागला. वृत्तपत्रात त्याचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. त्याच्या मित्र परिवारात मोठी भर पडली. मग आम्ही थोडेफार पैसे जमवून प्रिंटिंग प्रेस टाकला. स्वतःचे समर्पित साप्ताहिक काढले. त्यात त्याला या काळात लोकशाहीर अमरशेख भेटले. अमरशेख गेल्यावर त्याने मृत्यू लेख लिहला तेव्हा त्याचे वय अवघे १७ होते. अनेकनामवंत लेखकांचे लेख मागे टाकून मराठात तो प्रसिद्ध झाला. 'ती धुंदफुंद बेहोष तान आता विझली' आहे. तेव्हापासून तो आज तागायत त्याने शाहिरी क्षेत्राला वाहून घेतले आहे. याक्षेत्रात त्याचे महाराष्ट्रभर मोठे काम आहे. त्याच्या बरोबर मीही पत्रकारितेच्या क्षेत्रात आलो. आज आईवर दोन शब्द लिहितोय ही आईचीच देण आहे.
माझी आई भूतदयावादीही होती. माझ्या लहान मुलीसाठी मी एकदा पिंजऱ्यासह पोपट विकत आणला. मला मुलीप्रमाणे आईलाही हे आवडेल असे वाटले, पण माझी आई पिंजऱ्यातील पोपट पाहून माझ्यावर कमालीची संतापली. त्या पोपटाला आधी सोडून दे हे तीने मला बजावले. दुसऱ्या दिवशी पोपट पिंजऱ्यात गतप्राण झाला होता. त्याने स्वतःच मुक्ती मिळविली होती. आईने असा तळतळाट कोणाचा घेऊ नये, हे सांगितले. एक अशिक्षित बाईत एवढं आलं कुठून, हा प्रश्न आजही मला पडला आहे. कमालीचा संयम माझ्या आईत होता. तिला काळाचे वेध होते.
शेवटी एक गोष्ट येथे नमूद करतो, राजकारणाने कुटुंबाची वाताहत झालेली तिने अनुभवलेली होती. ती मला म्हणाली होती, भास्कर तुला एक सांगून ठेवते राजकारणात कधी पडू नको. परंतु तिचा हा सल्ला मी मात्र पाळू शकलो नाही. गोष्टच तशी घडली, नगराध्यक्ष पदाचे थेट निवडणुकीत आरक्षण पडलं, तशी मित्रांनी माझी निवडणूक केली. पहिल्या वेळेस पराभव झाला, पोट निवडणुकीत त्याच कड्यात कुस्ती उजरुन घेतली. विजयी झालो, मानाचे पद मिळाले. परंतु आईचे ते शब्द आजही कान आणि मेंदू बधीर करतात, एवढेच आता मी म्हणू शकतो. तिच्या स्मृतीसाठी हा शब्द जागर केला. माझ्या डोळ्यातील अश्रू आता अनावर झालेय, आई माझे जे जे चुकले असेल त्यासाठी मला माफ कर. फेसबुकचे हे पहिले पेज तुझ्या स्मृतीस समर्पित करतो. विनम्र अभिवादन !
- भास्कर सखुबाई कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव

Comments
Post a Comment