विजय रिंढे
मरणावर `विजय` मिळविणारा `किमया`गार !
व्यसनाने त्याची वाटचाल मरणाच्या दिशेने दिवसागणिक पुढे सरकत होती. त्याच्या संदर्भात रोज एक नवी अफवा येत होती. त्याचकाळात त्याच्या वडिलांची तब्बेत बरी नव्हती. तेही पुण्याला उपचार घेत होते. त्याच्या पहिले त्याचे वडील एक्झिट घेतील असा कोणी विचारही केला नव्हता. एक दिवस पुण्याहून निधनाचा निरोप आला. इकडे गावाकडची मंडळी त्याच्या घरी जमू लागली. डेडबॉडी नांदगावला कधी आणणार याची विचारपूस सुरु झाली. त्याच्या वडिलांना गावातील लोक रिंढेमामा म्हणायचे. रुग्णवाहिका नांदगावी कधी पोचेल यासाठी फोन सुरु झाले. मामा तुम्ही कुठपर्यंत आले, असे विचारू लागले. प्रत्येक फोन तो उचलत होता. त्याला जाणीव झाली. आपणच गेलो, अशी भावना लोकांची झाली आहे. त्याच्या दुखःवर ती मोठी डागणी होती. जिवंतपणी तो आपल्या मृत्यूची खबर स्वतः अनुभवत होता. निधन वडिलांचे झाले होते, लोक तोच मेल्याचे समजत होते. तरुणपणी मुलगा मेला, रिंढे मामावर दुखःचा डोंगर कोसळला असे म्हणून सर्वचजण हळळत होते. त्यात माझीही भर होती. मलाही वाटले विजू अकाली गेला. व्यसनाने त्याला संपविले. परंतु वास्तव वेगळे होते. त्याच्या वडिलांचे कलेवर घेवून तो नांदगावी येत होता. वडील गेल्याचे दुखः त्याच्या मनावर मोठा आघात करून गेले. त्याची व्यसनातून मुक्ती झाली. व्यसनमुक्ती केंद्रात त्याने काहीकाळ सेवा बजावली. आता स्वतःचे किमया फाउंडेशन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र नांदगाव येथे त्याने सुरु केले. अनेकांना व्यसनापासून मुक्तीचे धडे तो देत आहे. त्याचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
गुलाबराव रिंढे (मामा) हे मुळचे नांदगाव तालुक्यातील बोलठाण गावचे जमीनदार. शेकडो एकर घरची शेती. वकिली व्यवसायाच्या निमित्ताने ते नांदगावी स्थाईक झाले. हुशार वकील म्हणून त्यांची ख्याती होती. आपला मुलगा विजय यालाही त्यांनी वकील बनविले. विजू अभ्यासात हुशार. वकिलीचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तोही वकिली व्यवसायात वडिलांना मदत करु लागला. त्याच्या हातात चांगला पैसा खेळू लागला. त्यामुळे तो चंगळवाद व व्यसनाकडे वळला. घरातच दारूसाठी चोऱ्याही करु लागला. दारुडे खोटे बोलण्यात पटाईत असतात असे म्हणतात. तोही खोटे बोलून पैसे मिळवू लागला. देशीदारूचे दुकान हाच त्याचा अड्डा बनला. दारूसाठी तो मित्रांकडे पैसे मागू लागला. नंतर मित्रही त्याच्यापासून दुरावले. दारुने त्याची सर्वत्र हाडहाड केली होती. घरातील पत्नीचेही दागिनेही त्याने चोरले होते. दारूसाठी तो वेडापिसा झाला होता. वडिलांनी त्याला सुधारण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले. व्यसनमुक्ती केंद्रातील अनुभव आणि वडिलांचे निधन यांच्यामुळे त्याचेत आमुलाग्र बदल झाला. आपण सुधारलो, इतरांना सुधारु असा निर्धार केला. आज त्याच्या केंद्रात अनेकजण व्यसनमुक्तीसाठी दाखल झाले आहेत. अनेकजण सुधारले, काही सुधारण्याच्या मार्गावर आहेत. आपलीही दारू सुटावी असे केंद्रात दाखल असलेल्याना वाटत आहे.
आज १६ जून विजय गुलाबराव रिंढे याचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किमया फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्रास भेट दिली. तेथील व्यसनमुक्तीसाठी आलेल्यांची भेट घेतली. त्यांचेशी संवाद साधला. त्यातील प्रत्येकाला आपणही व्यसनमुक्त व्हावे, असे वाटत आहे. त्यांचा दिनक्रम जाणून घेतला. `दारूचे व्यसन हा एक आजार आहे, तो उपचाराने बरा होतो` असे त्यांच्या मनावर बिंबवणारी पाटी होती. त्यांचेवर कसे उपचार केले जातात याचीही माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांनी एक सामुदायिक प्रार्थना म्हटली. `देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही, ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता आम्हाला दे. जी परिस्थिती आम्ही बदलू शकतो, ती बदलण्याचे धैर्य आम्हाला लाभू दे आणि अशा परिस्थितीत भेद जाणण्याचे ज्ञान आम्हाला दे.` या प्रार्थनेनंतर `तू शक्ती दे, तू बुद्धी दे` या गीताने सांगता झाली.
या केंद्रात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती हि की, जवळपास सर्वचजण सधन कुटुंबातील व्यक्ती होत्या. व्यसनाने त्यांचे सर्व कुटुंब दु:खी आहे. याची जाणीव त्यांना झाल्याची दिसून आले. ते प्रत्येकजण आपली कामे स्वत:च करीत होती. झाडझूड पासून ते जेवणापर्यंतची सर्वच कामे ते करीत होते. त्यांनी बनविलेल्या मिसळपावचा व चहापानाचा आस्वाद घेतला. शेवटी त्यांचा निरोप घेतला. सर्वांनी भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. जाता जाता विजय रिंढे याने आपला एक अनुभव सांगितला, तो मात्र मनात खोलवर जखम करुन गेला.
विजू सांगत होता, आज वटसावित्री पौर्णिमा आहे. त्यांच्या जीवनातील या दिवसाची एक आठवण आहे. माझी पत्नी वडाच्या झाडाची पूजा करुन आली. सात जन्मी हाच पती लाभावा यासाठी तिने साकडे घातले. त्यानंतर पती म्हणून माझ्या पाया पडली. मी नशेत होतो, आशीर्वादाऐवजी मी तिला दूर ढकलून दिले. तिने पतीधर्म निभावला होता, माझ्या व्यसनाने तो लाथाडला होता. याचे आज तीव्र दुखः होत आहे. आज माझ्या कुटुंबाची मला पूर्ण साथ आहे. आज माझा वाढदिवस व वटसावित्री पौर्णिमा आहे. आज मी व्यसनमुक्त झालो आहे, अनेकांना व्यसनमुक्त करीत आहे. माझे कुटुंब आज आनंदी आहे, तसेच माझ्या केंद्रातीलच नव्हेतर सर्वच व्यसनी व्यसनमुक्त व्हावे, अशी प्रार्थना करतो अशी सदभावना विजय रिंढे याने शेवटी व्यक्त केली, मी केंद्राला भेट दिली याबद्दल आभार व्यक्त केले. माझाही आजचा दिवस सार्थकी लागला. - भास्कर कदम, पत्रकार व माजी नगराध्यक्ष, नांदगाव

Comments
Post a Comment