सुरेश आणि सलीम दोन व्यक्तिमत्व !
सुरेश शेळके आणि सलीम शेख या दोन मित्रांचा आज वाढदिवस. यातील पहिला सुरेश हा राजकारण जाणणारा आणि प्रत्यक्ष निवडणुका लढवून करणारा, तसेच त्यावर लिहिणाराही. दुसरा संपूर्ण राजकारण जाणणारा परंतु प्रत्यक्ष त्यात न पडणारा. जो राजकारण करतो त्याला पाडणे आणि पडणे माहित असते. न करणारा मात्र काठावर राहून नरो व कुंजरो, अशी भूमिका घेणारा असतो. हे झाले राजकारणा बाबत.
सुरेश आणि सलीम मध्ये एक साम्य आहे. ते जगण्यासाठी आजही प्रामाणिकपणे झगडताहेत. सुरेशने यासाठी पत्रकारितेचा मार्ग पत्करला आहे. सलीम मनमाडला खारी-पावच्या बेकरीत डे नाईट रोजंदारी करीत आहे. हे दोघे सर्वसामान्य माणसांचे प्रतिनिधित्व (तथाकथित लोकप्रतिनिधी नाही) करतात. ही माणसे त्यांच्या प्रामाणिक प्रवृत्तीमुळे मला मनापासून भावतात. थोरा-मोठ्यांसाठी कुणीही मोठा बुके घेऊन जाईल. परंतु, जे तळागाळातल्या माणसांचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या अभिष्टचिंतनासाठी प्रेमाचे दोन शब्दही पुरेसे असतात.
सुरेश शेळकेचा मोठाभाऊ नंदू शेळके हा अशोक रसाळ यांच्या तालमीत घडलेला हाडाचा शिवसैनिक. खरेतर त्या काळात नाशिक जिल्ह्यात शिवसेना खऱ्याअर्थाने लढवय्येपणाने काम करीत होती ती मनमाडची शिवसेना.मनमाडच्या शिवसैनिकां वर शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विशेष प्रेम होते. त्यात बिनीचे शिलेदार होते, अशोक रसाळ, राजाभाऊ देशमुख, राजू छाजेड, अल्ताफ खान इत्यादी. नांदगावमध्ये अशोक रसाळ यांच्यामुळे पहिला शिवसैनिक नंदू शेळके हाच होता. त्याच्या पावलावर पाऊल टाकून सुरेश शेळके याने आपली वाटचाल चालू ठेवली. त्यानंतर पत्रकारितेत बापू आहेर याच्यामुळे रस घेतला. सध्या दै. सामनाचे नांदगाव वार्ताहर असून स्वतःचे शाकांबरीच्या तीरावर हे साप्ताहिक आहे. पदरमोड करुन त्यात सातत्य टिकविले आहे, ही बाब विशेष होय. सुरेश शिवसैनिक असूनही आक्रमक नाही. साईबाबांच्या श्रद्धा व सबुरीवर त्याचा विश्वास आहे. त्याचा मुलगा रोहित हा त्याच्या मदतीला आहे. पत्रकारिते बाबत दोघेही अधूनमधून चर्चा करतात. रोहितही सध्या साप्ताहिकाचे कामकाज पहातो. डीटीपी मध्ये त्याचा स्पीड कमालीचा आहे. एकहाती अंक तयार करतो. नम्रता हा गुण त्याच्याकडेही आहे. पत्रकारितेच्या बाबतीत नम्रता हा गुण विशेष असते, हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. आपले महानगर या दैनिकाचा बातमीदार म्हणूनही तो काम पहातो. मला या बाप बेट्यांची नम्रता विशेष भावते.
दुसरे असे की, सलीम शेख हे तसे मनमाडला बटर बेकरीत काम करतात. त्यांची बेकरी आणि कॉ. माधवराव गायकवाड यांचे कार्यालय जवळपास शेजारी शेजारी. यामुळे सलीमवर त्यांचा प्रचंड प्रभाव. त्यांच्या राजकारणातील चर्चेत बाबूजी यांचे नाव व कार्य प्रामुख्याने असायचे. सलीमला मनमाडचे राजकारण तोंडीपाठ असायचे. आमदार हिरुभाऊ गवळी आणि कॉ. माधवराव गायकवाड यांच्यातील राजकीय संघर्ष तो अचूक सांगायचा. त्याकाळात त्याचे राजकीय भाकिते बहुतांशी खरी असायची. आता विचारले तर तो म्हणतो सर्वच राजकीय भेसळ झाली आहे. तत्व कमी तडजोड अधिक अशी स्थिती आहे. पूर्वी पार्ट्या फिक्स असायच्या. पक्षीय लढती होत. आजचे राजकारण कमालीचे अस्थिर झाले आहे. त्यामुळे अलिप्तता सर्वात चांगली असे त्याचे मत आहे. सलीम बेकरीत जरी काम करीत असेल तरी तो नांदगावच्या एच. आर. हायस्कुलचा संचालक आहे. या कामात तो विशेष लक्ष देत आहे. आपल्यातील प्रामाणिकपणा त्याने जपला आहे. मित्र म्हणून त्याचे मोल अधिक आहे.
सुरेश आणि सलीम खरेतर दोन व्यक्ती असेल तरी त्यांच्या कामातील, वागणुकीतील प्रामाणिकपणा बघता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे म्हणणे वावगे ठरु शकत नाही. राजकारण, समाजकारण, शैक्षणिक क्षेत्र यात या दोघांनीही आपल्या कुवतीनुसार कार्य केले आहे. त्यामुळे त्यांना समाजात विशेष स्थान आहे. दोघांचा आज वाढदिवस आहे. त्याप्रीत्यर्थ त्यांना फिजिकल डिस्टन्स पाळून दुरुनच ऑनलाइन मनःपूर्वक शुभेच्छा !
- भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.

Comments
Post a Comment