महेंद्र बोरसे : बहुगुणी व्यक्तिमत्वाचा मित्र !
महेंद्र बोरसे माझा मित्र आहे. मैत्री असा प्रांत आहे. त्याला फारशा सीमारेषांचे बंधन असू नये, या ठाम मताचा मी आहे. मैत्रीच्या धाग्यात विविध प्रकारची गुंफण असते. त्याची वीण घट्ट असली की ती दीर्घकाळ टिकते. मैत्रीबाबत माजी मंत्री हेमंतनाना देशमुख यांनी फार छान विवेचन नांदगाव येथील एका भाषणात केले होते. ते माझ्या मनावर आजही कोरले गेले आहे. ते म्हणाले, मैत्री या नात्याला कोणतीही बाधा नसते. ज्या दिवशी बाधा निर्माण होते तेथेच ती संपते. माणसाच्या इतर प्रत्येक नात्यात बाधा असली तरी ते जन्माने, नात्याने कधीही तुटत नाही. मला हे त्याचे लॉजिक भावले इतकेच नव्हेतर मी ते प्रत्यक्ष अनुभवतोय.
माझा मित्र परिवार हा बहुगुणी तसाच बहुढंगी आहे. प्रत्येक माणसात एक वेगळे वैशिष्ट्य असते. ते दुसऱ्याकडे नसते. त्यातील चांगले ते वेचत चालावे, असा माझा मूळ स्वभाव. कुणाला आवडो अथवा ना आवडो; जिसकी उसकी पसंद. महेंद्र बोरसे माझ्या मैत्रीच्या नात्यात बसणारा बहुगुणी, बहुरंगी मित्र आहे. मला त्याचे व्यक्तिमत्व मनापासून भावते. तसे पाहिले तर माणूस हा गुणदोषाचा पुतळा असतो. कोण परिपूर्ण आहे. दुसऱ्याला नावे ठेवणे फार सोपे असते. महेंद्र बोरसे या व्यक्तीने पहिल्याच भेटीत माझ्यावर मैत्रीचे गरुड केले. ते आज तागायत कायम आहे. आज महेंद्र बोरसे याचा वाढदिवस. अलीकडच्या धोरणानुसार नेहमीप्रमाणे शब्दांची दुनिया सजवून साजरा करु या.
महेंद्र बोरसे याची माझी पहिली भेट तत्कालीन विधानसभेचे उमेदवार पंकज भुजबळ यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्याच गाडीत झाली. पहिल्याच भेटीत त्याने मला सांगितले मी तुम्हाला (चांगलं) ओळखतो. त्याचे बोलणे, राहणीमान, टापटीपपणा याचबरोबर त्याचे अक्षरही मला आवडले. प्रचारादरम्यान तो व्यवस्थित टिपणं घेत होता. काही माहिती वजा सूचना पंकज भुजबळ यांना करत होता. त्याप्रमाणे पुढील सभेतील भाषणात त्याचा उपयोग केला जायचा. नांदगाव तालुक्यातील एवढी बारकाईने माहिती असलेल्या या माणसाने मला केंव्हाच आपलंसं केलं होतं.
महेंद्र बोरसे आणि राजकारण असे प्रकार पुढे उदयाला आले. महेंद्र बोरसे यांच्या पत्नी जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकल्या. कधी कधी उत्कर्ष हाच असूयेचे कारण बनतो. प्रगतीला असूयेची धारदार किनार असते, हे महेंद्रभाऊला हळूहळू कळू लागले. चित्र थोडेफार बिघडू लागले. आ. पंकज भुजबळ यांच्या कार्यकाळातच ते त्यांच्यापासून थोडे दुरावले. एकमात्र खरे की महेंद्र बोरसे यांचा कार्यालयीन दरबार भरलेला असायचा. मला मात्र मित्र म्हणून वाईटच वाटले. यात असूया होती की महत्वाकांक्षा ह्याचे उत्तर मी आजही शोधतो आहे. बरे जाऊ द्या.
महेंद्र बोरसे याने आपले स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवले आहे. महेंद्र बोरसे हा तसा कलासक्त माणूस आहे. त्याने साकोऱ्याला बाबा महाराज सातारकर यांचे कीर्तन घडवून आणले. नांदगाव शहरात आताचे खासदार अमोल कोल्हे यांचा संभाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर भव्य कार्यक्रम केला. दोन्ही कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. नेटकं नियोजन करण्यात आले होते. आजही अनेक नांदगावकरांना महेंद्रभाऊ भावतो. नांदगाव तालुक्यातील छोट्या मोठ्या गोष्टीत त्याचा सहभाग असतो. भरपूर मित्र परिवार जमवला आहे. देर से आयेगे लेकीन दुरुस्त आयेगे, ह्या माझ्या भावना आहे. रस्त्यात खाचखळगे असतात, त्याकडे दुर्लक्ष करु नये, ह्याच एक मित्र म्हणून वाढदिवसाच्या प्रामाणिक शुभेच्छा !
- भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.

Comments
Post a Comment