सुमितचे अभिष्टचिंतन !
सुमित सोनवणे, नुकताच मिसुरर्ड फुटू लागलेला महाविद्यालयीन विद्यार्थी. तेथेच खऱ्याअर्थाने एका सामाजिक कार्यकर्त्यांला धुमारे फुटले होते. सुमित पहिल्यांदा मला भेटला तेव्हाच मला त्याच्यात एक कार्यकर्ता दडलेला दिसून आला. चळवळीतील कार्यकर्ता अधिक धीट असतो. प्रश्नांबाबत तो आक्रमक असतो. सुमित मला आक्रमतेऐवजी प्रश्नांबद्दल तळमळ असलेला मवाळपंथी कार्यकर्ता जाणवला. आपल्यासोबत माणसे जोडण्याची त्याची कला मला उपजत असल्याचे दिसून आले. आपल्या वयाची तरुण मंडळी त्याने त्याच्या उपजत स्वभाव गुणधर्मानुसार जमवली होती. त्यांचेत मात्र त्याने शंभर टक्के समाजकारणाचे बीज रुजविले. आजचा तरुण दिशाहीन झालाय असे अलिकडे खूपदा ऐकले इतकेच नव्हेतर अनुभवले. परंतु सुमितची जडणघडण वेगळ्याच धाटणीची वाटली. सुमितने स्वतःबद्दलचा प्रामाणिक विश्वास इतरांत रुजविला. त्याशिवाय इतरजण सामाजिक कार्यासाठी सोबत येत नाही हा माझा अनुभव आहे. सुमितने आज समवयस्क तरुणांबरोबर ज्यांना सामाजिक कार्यात रस आहे अशांनाही एकत्र आणले आहे. त्याचं वय आज त्याच्या सोबत आहे. आज त्याचा वाढदिवस आहे त्याचे अभिष्टचिंतन करतांना मनात एक अनामिक भीती वाटते, ती ही की काहींना चांगले बघवत नाही. त्यांच्यापासून त्याने सावध राहिले पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांची वाट कधीच सरळ नसते, हा आजवर चा अनुभव आहे.
मळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा सुमितने युवा फाउंडेशनच्या नावाने सामाजिक संघटन उभे केले आहे. आमच्या श्रीकृष्ण मंदिरात त्यांचा एक छोटेखानी कार्यक्रम होता. त्यावेळी आपल्या कामात सातत्य असणे गरजेचे आहे, आरंभ शूर लवकर संपतात, असा सल्ला मी त्या कार्यक्रमाचा पाहुणा म्हणून दिला होता. आज सुमित व त्याच्या युवा फाउंडेशन काम बघता त्यात सातत्य तसेच विविधता आहे. त्यामुळे आज त्याला समाज मान्यता मिळाली आहे, ती त्याने दीर्घकाळ टिकवून ठेवावी, हीच त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
- भास्कर कदम, नांदगाव.

Comments
Post a Comment