इरफान ...
इरफान तू गेलास तेव्हा
कोरोनाच्या बातम्यांना थांबवलंस
तुझ्या जाण्याचा धसका त्यांनी घेतला
तुझ्या जगण्यात खरा दम होता...
तुझ्या मरणाने कळले होते
जरी तुला कॅन्सरने छळले होते
जातिवंत कला मरत नसते
कल्पनेच्या जगात तू वास्तव होता...
इरफान तुला तुझी आई
पाळण्याऐवजी डोलीत बसवून
कोणत्या शाळेत घेऊन गेली
तू अजूनही लहानच होता...
इरफान तू जातांना मात्र
समाजाला शिकवून गेला की
कलेला कोणतीही जात नसते
म्हणून तू खऱ्याअर्थाने महान होता...
- भास्कर कदम, नांदगाव
इरफान तू गेलास तेव्हा
कोरोनाच्या बातम्यांना थांबवलंस
तुझ्या जाण्याचा धसका त्यांनी घेतला
तुझ्या जगण्यात खरा दम होता...
तुझ्या मरणाने कळले होते
जरी तुला कॅन्सरने छळले होते
जातिवंत कला मरत नसते
कल्पनेच्या जगात तू वास्तव होता...
इरफान तुला तुझी आई
पाळण्याऐवजी डोलीत बसवून
कोणत्या शाळेत घेऊन गेली
तू अजूनही लहानच होता...
इरफान तू जातांना मात्र
समाजाला शिकवून गेला की
कलेला कोणतीही जात नसते
म्हणून तू खऱ्याअर्थाने महान होता...
- भास्कर कदम, नांदगाव
Comments
Post a Comment