विजय पवार यांचा प्रकटदिन !
विजय पवार आणि आम्ही एका शाळेत होतो. मी शाळा हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला आहे. कारण एच. पी. टी. महाविद्यालयात नुकताच बी. जे. म्हणजे बॅचलर ऑफ जर्नालिझमचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु झाला होता. त्या पहिल्या बॅचचे आम्ही विध्यार्थी होतो. शाळा कसली ती डंगरी शाळाच होती. नाशिकमधल्या या शाळेत मी ग्रामीण भागातील विध्यार्थी होतो. बाकी सर्व नाशिकमध्ये राहणारे होते. यापैकी जवळपास कुणी नोकरीस होते, तर अनेकजण वेगवेगळ्या वृत्तपत्रात काम करणारे होते. यात सर्वात धाकला मीच असावा. गांवकरीतील सुधाकर पंडित, अरुण खोंडे, सौ. अनुराधाताई औरंगाबादकर, सौ. मिरजकरताई, तर इतरांमध्ये सुरेश भटेवरा, विजय पवार, उल्हास रहाणे, प्रभाकर मुराळकर, राजू जोशी, वैद्य, सुरेश पटवा, रहाळकर, शाहीर दामोदर उशीर इत्यादी मंडळी होती. यापैकी काही शिकायला होते आणि शिकवायचेसुद्धा. खरेतर ही सर्व नावे प्रथितयश आहेत. मी सोडून. आज यापैकी काहीजण आज हयात नाहीत. त्यांचीही आठवण आज आवर्जून होतेय.
आमची स्टडीटूर त्याही वेळेला दिल्लीला गेली होती. त्या आठवणी खूपच मजेशीर पण अनुभव देणाऱ्या व अभ्यासपूर्ण आहे. आमचे सोबत एम. कुलकर्णी सर, लॉ कॉलेजचे काणेसर होते. आदरणीय अटलबिहारी वाजपेयीजी, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंत साठे, बॅ. गाडगीळ इत्यादींच्या भेटी आजही संस्मरणीय आहे. अटलजी यांची सही घेण्यासाठी मी डायरी पुढे केली , तेव्हा अटलजी मराठीत मला म्हणाले, काय काल वसंतजी साठे यांची भेट घेतली काय? कारण माझ्या डायरीवर समोरच्या एका पानावर वसंत साठे यांची सही होती. आमच्या या सर्व भेटीची बहुतांशी लीडरशिप सुरेश भटेवरा यांनी केली होती. त्यावेळी विजय नवल पाटील यांची नियोजित भेट आम्ही टाळली होती. त्यांनी नंतर कॉलेजकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली होती.
आम्हाला बॅ. गाडगीळ यांच्यामुळे संसदेचे सामूहिकरीत्या अंतर्गत दर्शन घडले. त्यावेळी दिल्ली मेट्रोवर चर्चा चालू होती. त्यानंतर आम्ही संसदेच्या कॅन्टीनचा आस्वाद घेतला होता. पोटभर खाल्यानंतर बील खूपच कमी झाले होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही त्या कॅन्टीनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्हाला जाऊ दिले नव्हते. त्यावेळी आर. सी. भारद्वाज यांचेकडून माहिती पत्रके घेण्याची सबब आम्ही सांगितली. याविषयीची खात्री झाल्यानंतर नंतर आम्हाला पुन्हा प्रवेश मिळाला. आम्ही कॅन्टीनमध्ये पुन्हा ताव मारला. ती चव आजही जिभेवर कायम आहे. आजच्या राजकारणाची चव मात्र बरीच बिघडल्याची जाणवते.
आज भूतकाळात मन रमण्याचे कारण असे की, आमचे जेष्ठ मित्र विजय पवार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या भाषेत प्रकटदिन. विजय पवार, प्रभाकर मुराळकर, उल्हास रहाणे हे नंतर जिल्हा माहिती अधिकारी झाले. (मुराळकर, रहाणे अकाली गेले) विजय पवार यांची कारकीर्द अतिशय चांगली राहिली. त्यावेळी माहिती खात्याकडे विविध जबाबदाऱ्या होत्या. आजमात्र माहिती कार्यालये मरणासन्न अवस्थेत आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे. विजय पवार आजही प्रिंट तथा सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांचा उत्साह आजही कायम आहे. त्यांचा परिवार एक आदर्श परिवार आहे. कुटुंबात त्यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने होईलच. मी मात्र मित्र परिवाराच्यावतीने त्यांचे अभिष्टचिंतन करतांना त्यांना उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो याच शुभकामना !
- भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.

Comments
Post a Comment