राजेंद्र रामभाऊ मोकळ हा आमच्या कुटुंबातील एक घटक. आमच्या सुख-दुःख यात त्याचे आख्खे कुटुंब सामील असते. राजुचे तसे शिक्षण जेमतेम. परंतु आकलन खूप चांगले. त्या जोरावर त्याने माजी आमदार अनिलदादा आहेर यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. त्याचा स्वभाव काहींना तापट वाटतो, परंतु त्याचे अंतर्मन मदतीसाठी कायम तत्पर असते. कोणीही सर्वांचे पूर्ण समाधान करु शकत नाही, त्याला राजू अपवाद असू शकत नाही. काहीवेळेस क्षमतेपेक्षा अपेक्षांचे ओझे अधिक होते, त्यावेळी मते मतांतरे असतात. राजू या चक्रव्यूहातून गेला आहे. आता तो त्याच्या विश्वात समाधानी आहे. त्याचा आज वाढदिवस. कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष उपस्थित राहून अभिष्टचिंतन केले पाहिजे होते. आज लॉकडाऊनमुळे ते होऊ शकत नाही. सोशल नव्हेतर फिजिकल डिस्टन्स ठेवून त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे, फोटोमात्र मागील वर्षाचा शेअर करीत आहे. राजूला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो, या मनःपूर्वक सदिच्छा !
- भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.
- भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.
Comments
Post a Comment