लोकनेते कारभारी पाटील-भिलोरे यांची एक जूनची जयंती :
गावरानबाजाचे अस्सल मातीतील नेतृत्व !
उभ्या महाराष्ट्रात एक जून म्हणजे शाळा मास्तरांनी निर्माण केलेला ठोक (होलसेल) वाढदिवस असलेला दिवस, असे सरधोपटपणे म्हटले जाते. या दिवशी अनेक नेत्यांच्या बरोबरीने व्यापारी, मजूर, शेतकरी, हमाल-मापारी म्हणजेच उच्चपदस्था पासून तळागाळातील अनेक व्यक्तींची जन्मतारखेची नोंद आहे. यापैकी काहींचा वाढदिवस व्यापक स्वरुपात साजरे होतात तर काहींना आपल्या वाढदिवसाची आठवणही येत नाही. अशाच काही घाऊक वाढदिवसाचे रुपांतर नंतर जयंती दिनात झाले आहे. त्यात आमचे जेष्ठ मार्गदर्शक कारभारी पाटील भिलोरे यांचे दोन वर्षापूर्वी २२ मे २०१८ ला निधन झाले. त्यांचा जन्मही १ जून १९४१ चा. म्हणून त्यांची आज जयंती. त्यांचे स्मृतीस अभिवादन करतांना त्यांच्या सोबतचे काही क्षणांना उजाळा द्यावा असे मनोमन ठरविले. सर्वांना हे आवडेल, रुचेल असेही नाही. यातून चांगले ते घ्यावे, बाकीचे दुर्लक्षित केले तरी हरकत नाही.
भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कारभारी पाटील इयत्ता पहिलीत गेले असतील. जेमतेम चवथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. राजकारणात त्यांनी आमदारकी सोडून तालुक्यातीलच नव्हेतर जिल्ह्यातील अनेक पदे आपल्या अंगभूत हुशारीने मिळविली, भूषविली, गाजविली. शिक्षण आणि राजकारण याचा फारसा संबंध नसावा असे त्यांचेकडे त्याकाळात असलेली पदे याची यादी पहाता वाटते. ही यादी मोठी आहे. चवथी पास असलेला या नेत्याने शिक्षण संस्थेचे अध्यक्षपद अनेक वर्षे भूषविले. अनेक पदवीधरांना रोजीरोटीस लावले. शाळाही नावारुपास आणून अनेक विध्यार्थ्यांचे भवितव्य घडविले. कारभारी पाटील-भिलोरे हे गावरान बाजाचे निर्धार पक्का असलेले अस्सल मातीतील कसलेले नेतृत्व होते. हे सर्व तसे हेवा वाटावे असेच आहे. अनेकांनी त्यांचा हेवा केलाही. त्याकडे कारभारी पाटील यांनी सर्व राजकीय कसबपणाला लावून मात केली.
कारभारी पाटील यांच्याकडे पट्टीचे वक्तृत्व नव्हते. बोलीभाषा ग्रामीण ढंगाची. परंतु दूरदृष्टी, अचूक निर्णयक्षमता या जोरावर त्यांनी अनेकदा विरोधकांवर मात केली. त्यांच्यादृष्टीने जय पराजय महत्वाचा नसायचा. ते निर्धाराने लढण्यास महत्व द्यायचे. पराभवाने न खचण्याचा त्यांचा गुण फार महत्वाचा होता. आजचा मतदार उद्या पुन्हा स्वीकारेल, हा आत्मविश्वास त्यांच्याठायी असल्याने त्यांनी मतदारांचा द्वेष कधी केला नाही. म्हणून जय-पराजय अशी अखंड मालिका त्यांची अखेरच्या श्वासापर्यंत चालू होती. लोकांनी सतत आपल्यालाच का स्वीकारावे. आपल्या चुकांचे आपणही परीक्षण करावे, असे त्यांचे मत होते. ते दुसऱ्याच्या मताची किंमत करीत असत म्हणून त्यांनी नांदगावच्या राजकारणातील आपले अढळपद कायम ठेवले होते.
साधी राहणी आणि साधीच विचारसरणी असे कारभारी पाटील होते. 'एक बिडी आणि सात काड्या' असे त्यांचे वर्णन गंमतीने केले जायचे. फार मोठे तत्वज्ञान कारभारी पाटील यांनी कधी मांडले नाही. त्यांची विचारधारा वास्तवाचाच अधिक विचार करायची. बडेजाव त्यांनी कधी मिरविला नाही. त्यांच्या राहणीमान व बोलीभाषेवरुन ते पुढारी कधी वाटलेच नाही. सरकारी कार्यालयात सर्वसामान्य ग्रामस्थांप्रमाणे आपल्या कामाची मांडणी करायचे. अधिकारी नखरे करायला लागला की ते आपला 'रामावतार' दाखविण्यास मागेपुढे पहात नसत. अधिकाऱ्यांकडून जनतेची कामे करुन घेण्यासाठी पाठपुरावा करणे ही त्यांच्या कामाची खासियत होती. आजकालच्या काही ताज्या पुढाऱ्यांनी त्यांचा हा गुण आत्मसात करावा असा आहे.
कारभारी पाटील यांचा राजकारणाचा प्रारंभ १९६५ पासून झाला. खिर्डी-भौरी-सोयगाय या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच झाले. नंतर १९७२ मध्ये भौरी ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच बनण्याचा मान त्यांना मिळाला. नंतर चढत्याक्रमाने पंचायत समिती सदस्य, सभापतीपद १९८० मध्ये त्यांनी भूषविले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची असलेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक व सभापती म्हणून १९८४ पासून दीर्घकाळ कामकाज पाहिले. नाशिक जिल्हा दूध संघाचे सभापतीपद त्यांनी भूषविले. तालुका देखरेख संघाचेही ते संचालक होते. नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ते १९९९ मध्ये निवडून आले. याचबरोबर ज्ञानेश्र्वर विद्या प्रसारक संस्था वडाळीचे सुरवातीला उपाध्यक्ष आणि नंतर मरेपर्यंत ते अध्यक्ष होते. आता त्यांचा हा वारसा त्यांचा नातू डॉ. सागर भिलोरे हा चालवीत असून तो या शिक्षण संस्थेचा विद्यमान अध्यक्ष आहे. कारभारी पाटील यांचे चिरंजीव चांगदेव हा राजकारणात तसा फारसा चंट नाही. कमी बोलणे आणि वाट न भूलणे असा त्याचा स्वभाव आहे. दुसरा दत्तू हा शेती एके शेती असा आहे.
कारभारी पाटील-भिलोरे फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून त्यामार्फत सामाजिक व शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्याचा मनोदय डॉ. सागर याने व्यक्त केला आहे. यंदाच्या वर

Comments

Popular posts from this blog

विजय रिंढे

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

भोंदूबाबा आणि संसार ...