बाबा आढाव : वाढदिवसानिमित्त एक चिंतन ;
बाबा, आता चळवळीचा चाफा खंत करतोय !
बाबा आढाव म्हणजे एक चळवळीतील धगधगते अग्निकुंड; असे जरी असले तरी त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात चाफ्याचा सुगंध कायम दरवळत असतो. या दोन्हींचा मेळ फक्त बाबा आढाव यांचेसारखी असामान्य व्यक्तीच साधू शकते. आज सकाळी मी माझ्या अलिकडच्या काळातील माझ्या तरुण मित्रांशी बाबा आढाव यांचे विषयी बोलत होतो; तेव्हा ते माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. भाऊ, कोण हे बाबा आढाव, असा सरळ प्रश्नच त्यांनी मला केला. माझ्या मनाला धक्काच बसला. आजच्या पिढीचे चळवळीशी नातं उरलेय का, हा प्रश्नच मला भेडसावू लागला. एवढी उदासीनता का आलीय. मोबाईलचा चाळा आणि वाचनाचा अभाव ह्याचा तर हा परिणाम नाही ना?
बाबा आढाव म्हणजे एक गाव एक पाणवठा, संघाच्या ढोंग बाजीवर प्रहार करणारा वैचारिक योद्धा, आणीबाणीच्या काळात संघर्ष करणारा निधड्या छातीचा मर्द. हमाल मापारी महासंघाचा संस्थापक, असंघटित क्षेत्रातील घटकाला संघटित करुन त्यांच्यात आत्मभान जगविणारा समाजदूत, समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करणारा जागल्या, अशी एक ना अनेक रुपं बाबा आढवांची आहेत. बाबा आढवांचे जीवन चरित्रास अनेक ठिकाणी शब्द अपुरे पडतात. राष्ट्र सेवा दल हा त्यांचा श्वास आहे. पूर्वी आरएसएस व राष्ट्र सेवा दल असे वैचारिक द्वंद्व चालत असे. शाखेला शाखेने उत्तर दिल्या जायचे. सेवा दल बढाना है, भूलो मत मत अशा घोषणा उच्चारवाने दिल्या जायच्या. आज राष्ट्र सेवा दल क्षीण झालेय, आणि संघ मजबूत झालाय. त्यामुळे निधर्मी वैचारिक चळवळ दुबळी झालीय.
एसेम जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान, भाई वैद्य, यदुनाथ थत्ते या प्रखर विचारवंतांच्या मांदियाळीतील आज फक्त बाबा आढाव उरले आहेत. त्यांनी आजही वयाच्या ९० वर्षी वैचारीकच नव्हेतर रस्त्यावरील संघर्षाची तडफ ठेवली आहे. परंतु साथसंगत दुबळी झाली आहे. समूहाचा पुरुषार्थच जणु गळून पडलाय, ही खंत आहे. कुठल्याही व्यवस्थेत विरोध कधीही दुबळा नसावा, अन्यथा हुकूमशाही दूर नाही असे समजावे. ती लोकशाहीच्या नावाने छुपीही असू शकते. हे भयानक वास्तव आहे. आजही जगभरात याची उदाहरणे आहेत.
बाबा आढाव व त्यांचे कार्य आजच्या पिढीला माहित नसणे हे मोठे विचित्र वाटते. त्याला कदाचित आम्ही सर्व या चळवळीतील सैनिक कारणीभूत आहोत असेही वाटते. बाबा आढाव यांना आम्ही समता मंचच्या क्रांतीदिन ते स्वातंत्र्यदिन सप्ताहच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. तत्कालीन कामगार मंत्री हेमंतनाना देशमुख यांना समता पुरस्कार बाबांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. हेमंत नाना यांची नांदगाव ही सुरवातीच्या काळातील कर्मभूमी होय. त्यांचे बालपण नांदगावात गेले आहे. माजी आमदार अनिल आहेर, संत साहित्यिक यशवंत पाठक इत्यादी मंचावर उपस्थित होते. त्याला आता जवळपास वीस वर्षे होताहेत. त्यावेळच्या बाबांच्या जोशपूर्ण वैचारिक मांडणीमुळे श्रोत्यात नवचैतन्य निर्माण झाले होते. समाजापुढे अशी मांडणी करणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतके वक्ते आता उरले आहेत. अलिकडे ध्येयवादी वक्त्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या मान आणि मानधन या चक्रव्यूहात बहुतांशी वक्ते अडकल्याचे दिसून येत आहे. ही एक वैचारिक खंतच आहे.
बाबा आढाव त्यावेळी मला म्हणाले होते, भास्कर तू पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेस. तुमच्या नांदगाव जवळच सयाजी महाराजांचे जन्मगाव कौळाणे आहे. सयाजी महाराजांचे खूप मोठे समाजकार्य आहे. तळागाळातील घटकांच्या उत्थाना साठीचे त्यांचे कार्य आपल्याकडील आजच्या पिढीला फारसे माहित नाही. हे सर्व समाजापुढे आले पाहिजे. त्यातून प्रेरणा, स्फूर्ती मिळते, जागृतीही निर्माण होते. मला हे जेवताजेवता सांगत होते. आम्ही त्यावेळी माझे मित्र इकबाल शेख याचे घरी जेवत होतो. इकबाल हा आमच्या बरोबर राष्ट्र सेवा दलात वाढलेला. त्यावेळी तो पुण्यात सहाय्यक कामगार आयुक्त होता. त्यानेच आग्रहाने बाबा आढाव यांना नांदगाव येथे आणले होते. इकबाल सेवा दलाचा म्हणून बाबांचे त्याच्यावर विशेष प्रेम होते. आमच्यासोबत त्यावेळी कचेश्वर बारसेसर होते. जेवणानंतर बाबांनी आमच्या हातावर त्यांचे आवडते चाफ्याचे फुल ठेवले होते. तो विचारांचा सुगंध आजही आमच्या मनात दरवळतोय, परंतु चळवळीच्या या चाफ्याची ताकद क्षीण झाल्याची एक खंत आजही आमच्या मनाला अस्वस्थ करीत आहे. बाबा, तुम्ही आज वयाची नव्वदी पार केली आहे. आयुष्याचे शतक तुम्ही त्याच ताकदीने, उमेदीने ठोकावे, अशी तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा !
- भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.

Comments
Post a Comment