Posts

प्रकाश गोयल : मनमाडची ठिणगी विझली ! सूर्याने डोके वर काढण्याच्या आत प्रकाशाची ठिणगी कायमची विझली. काल दि. १८ जून २०२० रोजी आमचा पत्रकार मित्र पहाटेच्या सुमारास अंतर्धान पावला. आत्मा-परमात्म्याच्या पलिकडचा विचारधारा असलेला हा मित्र. त्याला कोणत्याही एका सरळ मापात कोणी तोलू – मापू शकत नव्हते. अतिशय निर्विकारपणे स्वत:च्या जगण्याकडे त्याने पाहिले. खऱ्याअर्थाने तो भटक्याच. त्याने काल अखेरचा श्वास घेतला तेव्हाच त्याची या दुनियेतील भटकंती संपली. तो गेला तेंव्हाही भटकंतीवरच होता. भटक्या होता पण भरकटलेला अजिबात नव्हता. त्याचेत कोणते गुण नव्हते; सर्व गुण संपन्न होता. तितकेच त्याच्या जगण्याला अवगुणाची झालरही होती. त्याला कोणी कलंदर म्हटले तर कोणी बिलंदर त्याने त्याची कधी पर्वाच केली नाही. पत्रकारितेचे मापदंड त्याने कधी पाळलेच नाही. पण तसा तो जातीवंत पत्रकार होता. परंतु सातत्य नावाचा प्रकारच त्याचेकडे नव्हता. त्याच्या शब्दात तिरकसपणा ठासून भरलेला होता. स्वतःचे शारीरिक व्यंग त्याने लपविले नाही. `तैमूरलंग` नावाने त्याने समाजातील व्यंगावर बोट ठेवून अनेक रचना केल्या. त्याचे साप्ताहिक `ठिणगी` अनेक वि...
पांडुरंग सदाशिव साने उर्फ सानेगुरुजी यांचा आज निर्वाणदिन राष्ट्र सेवा दल नसते; तर आम्ही निधर्मी झालोच नसतो ! आम्ही राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत गेलोच नसतो, मानवता धर्म काय असतो हे आम्हाला कळलेच नसते. `खरा तो एकची धर्म; जगाला प्रेम अर्पावे !` अशी मानवता धर्माची शिकवण आम्हाला साने गुरुजींनी दिली. याचबरोबर `आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान` अशी न्यायासाठी लढण्याची उर्मी-उर्जा दिली. आमच्या बालसुलभ वयात आम्ही राष्ट्र सेवा दलाच्या शाखेत जावू लागलो होतो. विचार-आचार कशाशी खातात हे कळण्याचे ते वयही नव्हते. शाखेत खेळाबरोबर शिस्तीचे धडे दिल्या गेले; आणि शिस्तीबरोबर विचारही दिले गेले. वयपरत्वे विचार मनामध्ये घट्ट रुजू लागले. एक वैचारिक बैठक तयार होवू लागली. `पिळदार शरीर आणि मजबूत बांधा` हे शरीराच्या दृष्टीने महत्वाचे आहे. तशीच मनाची मशागत वैचारिक दृष्टीने तितकीच महत्वाची होय. शाखेत दोन्ही बाजू मजबूत केल्या जात असे. आज सेवा दलाच्या शाखेचे अस्तित्व नाहीच्या बरोबर आहे, ही मोठी खंत आहे. काळाबरोबर सेवा दल बदलले नाही, की मुलांच्या-पालकांच्या जडणघडणीत बदल झालाय, ही बाब विचार करायला लावणारी आहे....
Image
विजय बाविस्कर : सहृदयी-निगर्वी संपादक ! लोकमत नाशिक आवृत्तीचे खऱ्याअर्थाने पहिले पूर्णवेळ संपादक. आज ते संपूर्ण लोकमत आवृत्तीचे समूह संपादक आहे. त्यांचा हा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. लोकमतचे व्यवस्थापन हे सर्वांगीण विचार करणारे आहेत. त्यांच्या परिक्षेत पास होणे, त्यांच्या विश्वासाला पात्र होणे हे तसे सहज साध्य मुळीच नाही. व्यवस्थापनाच्या कसोटीस उतरून आपले स्वतःचे स्थान निर्माण करणे आणि पुण्यासारख्या शहरात लोकमतचे वेगळे स्थान निर्माण करणे तसे खूप अवघड. परंतु, विजय बाविस्कर यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. पायरी-पायरीने पद पादाक्रांत करणे, यात कष्ट-कर्तृत्व-नेतृत्व हे गुण महत्वाचे असतात. हे सर्व घटक विजय बाविस्कर यांचेत परिपूर्ण आहेत. शांत, निगर्वी स्वभाव, सदैव हसतमुख चेहरा, बोलण्यात मार्दव, सतत प्रयोगशील राहणे हे गुण त्यांचेतील खास वैशिष्ट्ये आहेत. याच जोरावर त्यांनी पुण्यात लोकमतला खास दर्जा प्राप्त करुन दिला आहे. `पुणे तेथे काय उणे` असे जरी म्हटले जात असले तरी पुण्यात अस्सल तेच टिकते असा अनुभव आहे. पुण्यातील चिकिस्तक, चोखंदळ वाचक आहे. त्यांची दाद-मान्यता मिळविणे, हे अवघ...
शांताबाई शेळके : ६ जून स्मृतीदिन : शांताबाईंनी 'धुळपाटी'वरील पहिली अक्षरे 'नांदगाव'ला गिरविली ! नांदगावला शांताबाई शेळके यांचे बालपण गेले आहे. शांताबाई शेळके यांनी नांदगावच्या गुप्ता कॉलनीतील आठवणींची `धूळपाटी` आपल्या आत्मचरित्रात रंगविली आहे. याचा आम्हा नांदगावकरांना रास्त अभिमान आहे. शांताबाई म्हणतात नांदगावचे दिवस सर्वात सुखाचे होते. गुप्ता शेठने राहायला बंगल्यात जागा दिली होती. दिलेला बंगला छोटा पण सुबक होता. नांदगावला प्रल्हाद शेठ गुप्ता, पांडुरंगबाबा कवडे, विनायक पाटील हे त्यांच्या वडिलांचे घनिष्ठ मित्र होते. त्यांचे वडील नांदगावला वनाधिकारी म्हणून बदलून आले होते. गुप्ता-कवडे-पाटील या मित्रांनी शांताबाईच्या वडिलांना `नांदगावमध्येच घर घ्या, जमीन घ्या, इथेच कायमचे स्थाईक व्हा` असा सल्ला दिला होता. त्यांच्या वडिलांनाही तसे वाटू लागले होते. असे घडले असते तर महाराष्ट्रातील ख्यातनाम कवयित्री, लेखक, साहित्यिक, पत्रकार, गीतकार तथा अ. भा. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा खऱ्याअर्थाने `नांदगाव`कर झाल्या असत्या. नांदगावच्या इतिहासात ते एक मानाचे पान झाले असते. परंतु त्यांचे फ...
युनूस रफिक शेख (वकील) : पदरमोड करणारा प्रामाणिक वकील ! नांदगाव शहराची पूर्वीची रचना जातीनिहाय होती, हे आज अनेकांना थोडं वेगळं तसेच काहींना आश्चर्य वाटेल; परंतु हे वास्तव आहे याच्या काही खुणा आजही अस्तित्वात आहेत. सोनार गल्ली, कासार गल्ली, तेली गल्ली, कुंभारवाडा, जंगम गल्ली, न्हावीवाडा, चांभारवाडा, मांगवाडा, महारवाडा, होलारवाडा, धनगरांची गढी, मराठ्यांची पाटीलगल्ली, मुसलमानांचा पन्नूवाडा, मारवाडी गल्ली, ब्राम्हण गल्ली अशा गल्ल्या व बोळा अस्तित्वात होत्या. त्याचप्रमाणे काशी पाटलाचा वाडा, बाईजाबाईचा वाडा, थत्ते वाडा असे वाडेही होते. यापैकी अनेक गल्ली बोळाचे आता नामकरण झाले आहे. जातीवाचक उल्लेख कमी झाले आहेत. जसे चांभारवाड्याचे श्रीकृष्ण नगर, मांगवाड्याचे गांधीनगर, महारवाड्याचे बौद्धनगर असा बदल झाला. वेशी बाहेर आता गावाचा विस्तारही झाला आहे. काही गल्ल्यांची नावे आजही जातीयवाचकच आहे. हा झाला गल्ली बोलाचा थोडक्यात परिचय. थोडक्यात सांगायचा मुद्दा असा की, या गावात सर्वच जातीजमाती गुण्यागोविंदाने जवळपास एकत्रच रहात, नांदत होत्या. नांदगांवचे संस्थापक काशी पाटील (धनगर) यांना मानले जाते. ते अति...
बाबा आढाव : वाढदिवसानिमित्त एक चिंतन ; बाबा, आता चळवळीचा चाफा खंत करतोय ! बाबा आढाव म्हणजे एक चळवळीतील धगधगते अग्निकुंड; असे जरी असले तरी त्यांच्या मनाच्या एका कोपऱ्यात चाफ्याचा सुगंध कायम दरवळत असतो. या दोन्हींचा मेळ फक्त बाबा आढाव यांचेसारखी असामान्य व्यक्तीच साधू शकते. आज सकाळी मी माझ्या अलिकडच्या काळातील माझ्या तरुण मित्रांशी बाबा आढाव यांचे विषयी बोलत होतो; तेव्हा ते माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होते. भाऊ, कोण हे बाबा आढाव, असा सरळ प्रश्नच त्यांनी मला केला. माझ्या मनाला धक्काच बसला. आजच्या पिढीचे चळवळीशी नातं उरलेय का, हा प्रश्नच मला भेडसावू लागला. एवढी उदासीनता का आलीय. मोबाईलचा चाळा आणि वाचनाचा अभाव ह्याचा तर हा परिणाम नाही ना? बाबा आढाव म्हणजे एक गाव एक पाणवठा, संघाच्या ढोंग बाजीवर प्रहार करणारा वैचारिक योद्धा, आणीबाणीच्या काळात संघर्ष करणारा निधड्या छातीचा मर्द. हमाल मापारी महासंघाचा संस्थापक, असंघटित क्षेत्रातील घटकाला संघटित करुन त्यांच्यात आत्मभान जगविणारा समाजदूत, समाजातील वाईट प्रवृत्तीवर प्रहार करणारा जागल्या, अशी एक ना अनेक रुपं बाबा आढवांची आहेत. बाबा आढवांच...
लोकनेते कारभारी पाटील-भिलोरे यांची एक जूनची जयंती : गावरानबाजाचे अस्सल मातीतील नेतृत्व ! उभ्या महाराष्ट्रात एक जून म्हणजे शाळा मास्तरांनी निर्माण केलेला ठोक (होलसेल) वाढदिवस असलेला दिवस, असे सरधोपटपणे म्हटले जाते. या दिवशी अनेक नेत्यांच्या बरोबरीने व्यापारी, मजूर, शेतकरी, हमाल-मापारी म्हणजेच उच्चपदस्था पासून तळागाळातील अनेक व्यक्तींची जन्मतारखेची नोंद आहे. यापैकी काहींचा वाढदिवस व्यापक स्वरुपात साजरे होतात तर काहींना आपल्या वाढदिवसाची आठवणही येत नाही. अशाच काही घाऊक वाढदिवसाचे रुपांतर नंतर जयंती दिनात झाले आहे. त्यात आमचे जेष्ठ मार्गदर्शक कारभारी पाटील भिलोरे यांचे दोन वर्षापूर्वी २२ मे २०१८ ला निधन झाले. त्यांचा जन्मही १ जून १९४१ चा. म्हणून त्यांची आज जयंती. त्यांचे स्मृतीस अभिवादन करतांना त्यांच्या सोबतचे काही क्षणांना उजाळा द्यावा असे मनोमन ठरविले. सर्वांना हे आवडेल, रुचेल असेही नाही. यातून चांगले ते घ्यावे, बाकीचे दुर्लक्षित केले तरी हरकत नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा कारभारी पाटील इयत्ता पहिलीत गेले असतील. जेमतेम चवथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. राजकारणात त्यांनी आमदा...