Posts

Image
पापा गुप्ता : एका कष्टप्रद जीवनाची अखेर !   जगणे नेमके कशाला म्हणावे? असा प्रश्न माणसाच्या मरणाने अधिक जाणवू लागतो. जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून कुणाचीही सुटका नाही, हे अंतिम सत्य होय. परंतु कधी-कसे हा भाग भावनात्मकदृष्ट्या महत्वाचा आहे. मृत्यू कधी येणार हे अनिश्चित आहे. कसा हे मात्र काहीसे माणसाच्या हाती आहे, असे मानले जाते. याचा अर्थ `काळजी घ्या` या शब्दात सामावलेला आहे. माणूस खरच निष्काळजी असत नाही; अनेकदा परिस्थिती तसेच स्वभाव त्याला कारणीभूत असतो. आज दि. १ जुलै २०१८ पहाटेच्या सुमारास आमचा मित्र असलेला पापा उर्फ राजेंद्र मधुकर गुप्ता याचे रूढअर्थाने अल्पशा आजाराने निधन झाले. जेमतेम ५८ वर्षाचा होता, म्हणजे शासकीय नोकरीच्या भाषेत सेवा निवृत्तीचे वय. पापाने अवघ्या आयुष्यातून निवृत्ती घेतली. त्याच्या जाण्याने त्याचा गुप्ता परिवार हादरलाच; परंतु अवघा मित्रवर्ग शोकमग्न झाला. अत्यंत सुस्वभावी तसेच भारदस्त व्यक्तिमत्व पापाचे होते. थट्टामस्करी करणारा हसतमुख असणारा पापा सर्वांना रडवून जातो हे दु:ख शब्दापलीकडचे आहे. त्याच्या जगण्याचीच क्रूरथट्टा नियतीने केली. पापा गुप्ताच्या भाळी कष...

अंगणवाडी भरती : एक वास्तव

Image

शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र !

Image
शिवाजी - नागसेन : शत्रू आणि मित्र ! शिवाजी पाटील आणि नागसेन चव्हाण हे एकेकाळचे कट्टर शत्रू. पहिल्या फिर्यादीत शिवाजी शंकर पाटील नाव आले की दुसऱ्या फिर्यादीत नाझर फत्तू चव्हाण हे नाव यायचेच. महिना भरात आठ-दहा फिर्यादी एकमेकांविरोधी व्हायच्या. यामुळे दोघेही एकाचवेळी हद्दपार झाले. दोघांचा झगडा हा व्यक्तिगत नव्हता. दोघेही आपापल्या समाज घटकासाठी संघर्ष करीत होते. त्यावेळी तो संघर्ष चुकीचा की बरोबर हे आज ठरविण्यात काही मतलब नाही. तो एक संघर्षशील काळा इतिहास आहे. दोघांचेही आयुष्य त्यामुळे पणाला लागले. आज हा इतिहास आठविण्यास कारण कि, आज १ जून शिवाजी पाटील यांचा वाढदिवस. त्याचे अभीष्टचिंतन वेगळ्या संदर्भात करु या, असे मी मनोमन ठरविले. माझ्या एकसष्टीपूर्ती सोहळ्यात नागसेन चव्हाण यांचा सन्मान शिवाजी पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी दोघांनी गळाभेट   घेतली. दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही सांगून जात होते. या कल्पकतेबद्दल भैय्या चव्हाण सरांना धन्यवाद देतो. त्यामुळे गत इतिहासात डोकावता आले. काळानुसार संदर्भ बदलतात हेच खरे. खरे तर काळाच्या उदरात अनेक प्रश्नांची उत्तरे दडली आहेत. त्...
Image
मित्र हा मित्रच असतो ! मित्र या शब्दात सारे काही सामावलेले असते. तसा हा शब्द कुणाच्याही कवेत न मावणारा शब्द आहे. खरे तर यात गुणदोषांचे बेमालूम मिश्रण असते. लहानपणी मैत्रीचा खेळ मजेशीर असतो. मोठेपणी त्यात फारसा फरक पडलेला नसतो. लहानपणी मैत्रीचा भाव निरागसपणे व्यक्त केला जातो; तर मोठेपणी त्याला वेगळीच झालर लावल्या जाते. काही भावना व्यक्त केल्या जातात, काही भावना व्यक्त न होताच बरेच काही सांगून जातात. मित्राच्या बाबतीत पु. ल. देशपांडे यांनी फार छान सांगितले आहे, ते म्हणतात ``ज्याच्या जवळ मनातील भाव व्यक्त करताना लज्जा, संकोच वाटत नाही. खोटे बोलावसे वाटत नाही. फसवावेसे वाटत नाही. पापपुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही. ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो. ज्याच्या जवळ पराभवाचे शल्य उघडे करायला कमीपणा वाटत नाही. ज्याच्या सुख दुखःशी आपण एकरूप होवू शकतो तो खरा मित्र. मित्र ही जीवनातील आवश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळण्यासाठी मित्र हवाच.`` ``मित्र हा मित्रच असतो``, असे माझे मित्र माजी आमदार अनिलदादा आहेर माझ्या एकसष्टीपूर्ती (दि. २५ मे २०१८) समा...

भास्कर कदम : २५ मे २०१८ एकसष्टीपूर्ती समारंभ सायंकाळी ६ वा. नांदगाव : अगत्यपूर्वक या !!

Image
      समतेच्या विचाराने लेखणीला धार आली !            आत्मनिवेदन – भास्कर कदम माझ्या जीवनाची कहाणी अत्यंत साधीसरळ आहे. एका अल्पशिक्षित तसेच पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सर्वसामान्य माणसाची कहाणी आहे. या कहाणीला अनेक वळणे, कंगोरे तसेच खाचखळगे आहेत. जसा जगलो तसा तुमच्या पुढे शब्दात मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. सर्वसामान्य माणसाने कितीही संकटे आली तरी ना उमेद होवू नये यासाठीचा खरा हा प्रपंच आहे. मोठा माणूस म्हणजे नेमके काय? हा प्रश्न मलाही पडला आहे. पैश्याने, पदाने, वयाने, मानाने असे विविध प्रकार समाजात दिसून येतात. खरे तर माणूस मनाने मोठा असावा, अशी जाणीव वयपरत्वे जवळपास सर्वांनाच होवू लागते. आपण समाज, आप्तस्वकीय व इतरांपासून काय शिकलो, शिकल्यानंतर समाजाला काय दिले, हे प्रश्न महत्वाचे वाटू लागतात. समाजशील जगण्यातून या प्रश्नाची उत्तरे मिळू लागतात. शिक्षण, संघटन, संघर्ष या त्रीसूत्रानुसार जीवनाची वाटचाल चालू आहे. सुरवातीला शाळेने मला शिकविले. समाजाकडूनही शिकलो, अजून खुपकाही शिकायचे आहे, शिकता शिकता शिकव...

भुजबळ हे भुजबळच !

Image
भुजबळ हे भुजबळच ! बाहुबली तसेच वादळी व्यक्तिमत्व असलेले नेते छगनराव भुजबळ यांना जामीन कधी मिळणार ?   असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडला   होता. त्याचे उत्तर उच्च न्यायालयानेच दिल्याने समर्थकांनी जल्लोष केला तर विरोधकांच्या ऊरात धडकी भरली. भुजबळ या नाव व कर्तृत्वात याचे उत्तर दडले आहे. भुजबळांवर सरासर सत्ताधाऱ्यांकडून अन्याय केला जात आहे, अशी भावना बहुतांशी झाली होती. अनेक आंदोलनात ती दिसून आली. भुजबळाशिवाय मतदार संघातील विकासाची कल्पना काहीशी खुजी वाटू लागली होती. हे त्यांचे विरोधकही खासगीत मान्य करतात. भुजबळ हे ज्या मुशीतून तयार झाले तिचा इतिहासच लढवय्या आहे. शेर बुढा भी हुवा तो ...  भुजबळ नेमक्या या व्याख्येत बसतात. भुजबळ यांना विरोधकांबरोबरच स्वकियांनीही अडचणीत आणले. त्यांना जितके शत्रू उघड आहेत तितकेच छुपेही आहे. पाठीत खंजीर खूपसल्याचा त्यांचा डीपीही बराच गाजला. शेवटी भुजबळ हे भुजबळच आहे. त्यांचा दरारा आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. फिनिक्सप्रमाणे राखेतून जन्म घेण्याचा त्यांचा मूळ पिंड आहे. शरीर थकले तरी तरी ते मनाने मजबूत आहे. काही दिवस ते नक्कीच चिंतनमनन कर...

अण्णा आणि गुळाचा चहा !

Image
अण्णा आणि गुळाचा चहा ! साहेबराव आनंदा आहेर उर्फ साहेबराव पाटील. अण्णा या टोपण नावाने सर्व परिचित. साहेबरावअण्णा म्हटले की एक खानदानी रुबाबदार व्यक्तिमत्व डोळ्यासमोर तरळते. साहेबरावअण्णा मावळतीकडे कलू लागलेला सूर्य आहे. याची पुरेपूर जाणीव त्यांना आहे. त्यांनी नुकतीच वयाची पंच्याह्त्तरी ओलांडली आहे. अण्णांचे शरीर थकले तरी मन आजही तरुण आहे. बोलण्यातला तो उत्साह आजही कायम आहे. साहेबरावअण्णा म्हणजे माणसाळलेला माणूस. त्यांनी जमविलेल्या गप्पांचा फडाला एक वेगळीच ग्रामीण चव आहे. चवीचा विषय आला म्हणून सांगतो. काल (दि. २ मे २०१८) त्यांच्याकडे भालूरला विठोबा आहेर यांच्यासोबत सहजच गेलो. विठोबा म्हणजे भालुरचा त्याकाळचा सर्वात तरुण सरपंच. साहेबरावअण्णा यांचा तो तत्कालीन विरोधक. आता मात्र त्याने अण्णाशी जुळवून घेतले आहे.   तसे माझे साहेबरावअण्णा यांचेकडे नियमित जाणे-येणे आहे. अनेकदा माजी आमदार अनिल आहेर तसेच आमदारकी सोडून सर्व राजकीय पदे मिळविलेले जेष्ठ नेते कारभारी पाटील, खूप कमीवेळा बापूसाहेब कवडे यांच्यासोबत मी असायचो. साहेबरावअण्णा हे माझ्या जेष्ठ मित्र व सल्लागारापैकी एक आहेत. त्यांचं ...