विजय पवार यांचा प्रकटदिन ! विजय पवार आणि आम्ही एका शाळेत होतो. मी शाळा हा शब्दप्रयोग जाणीवपूर्वक केला आहे. कारण एच. पी. टी. महाविद्यालयात नुकताच बी. जे. म्हणजे बॅचलर ऑफ जर्नालिझमचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु झाला होता. त्या पहिल्या बॅचचे आम्ही विध्यार्थी होतो. शाळा कसली ती डंगरी शाळाच होती. नाशिकमधल्या या शाळेत मी ग्रामीण भागातील विध्यार्थी होतो. बाकी सर्व नाशिकमध्ये राहणारे होते. यापैकी जवळपास कुणी नोकरीस होते, तर अनेकजण वेगवेगळ्या वृत्तपत्रात काम करणारे होते. यात सर्वात धाकला मीच असावा. गांवकरीतील सुधाकर पंडित, अरुण खोंडे, सौ. अनुराधाताई औरंगाबादकर, सौ. मिरजकरताई, तर इतरांमध्ये सुरेश भटेवरा, विजय पवार, उल्हास रहाणे, प्रभाकर मुराळकर, राजू जोशी, वैद्य, सुरेश पटवा, रहाळकर, शाहीर दामोदर उशीर इत्यादी मंडळी होती. यापैकी काही शिकायला होते आणि शिकवायचेसुद्धा. खरेतर ही सर्व नावे प्रथितयश आहेत. मी सोडून. आज यापैकी काहीजण आज हयात नाहीत. त्यांचीही आठवण आज आवर्जून होतेय. आमची स्टडीटूर त्याही वेळेला दिल्लीला गेली होती. त्या आठवणी खूपच मजेशीर पण अनुभव देणाऱ्या व अभ्यासपूर्ण आहे. आमचे सोबत एम. ...
Posts
- Get link
- X
- Other Apps
इरफान ... इरफान तू गेलास तेव्हा कोरोनाच्या बातम्यांना थांबवलंस तुझ्या जाण्याचा धसका त्यांनी घेतला तुझ्या जगण्यात खरा दम होता... तुझ्या मरणाने कळले होते जरी तुला कॅन्सरने छळले होते जातिवंत कला मरत नसते कल्पनेच्या जगात तू वास्तव होता... इरफान तुला तुझी आई पाळण्याऐवजी डोलीत बसवून कोणत्या शाळेत घेऊन गेली तू अजूनही लहानच होता... इरफान तू जातांना मात्र समाजाला शिकवून गेला की कलेला कोणतीही जात नसते म्हणून तू खऱ्याअर्थाने महान होता... - भास्कर कदम, नांदगाव
- Get link
- X
- Other Apps
रमेश सोर : हाडाचा-विचाराचा मजबूत सैनिक ! रमेश किसन सोर हा माझा मित्र. केवळ माझा मित्र म्हणून त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या विषय चांगले लिहावे, बोलावे असे नाही. अनेक बाबतीत त्याचे वेगळेपण आहे. त्याने जे अनुभवले, भोगले त्याची मोठी कहाणी आहे. त्याला चळवळीची, जगण्याच्या धडपडीची किनार आहे. रमेश म्हणजे खरे तर नियतीकडून परत मिळालेले रिटर्न गिफ्ट आहे. म्हणून त्याच्या आज असण्याचे मोल मोठे आहे. येणारा प्रत्येक दिवस त्याच्यासाठी, कुटुंबासाठी, आमच्यासाठी वाढदिवसच आहे. रोज एकेक दिवसाने तो वाढतो आहे. याचेच खरे समाधान आहे. एका सायंकाळी रमेश व मी नेहमीप्रमाणे गप्पा मारत बसलो होतो. रमेश खुर्चीवरून अचानक कोसळला. माझ्याजवळच डॉ. सुरेश गायकवाड हा बसलेला होता. त्याने क्षणाचा विलंब न लावता त्याला माऊथ ब्रेथींग दिले. तोपर्यंत रमेश गेल्याची चर्चा चौकात वाऱ्यासारखी पसरली होती. रमेश रिव्हर्स झाला. गोल्डन सेकंदात तो पुन्हा शुद्धीवर आला. हे माझ्यासमोर घडले. मी पुरता हादरुन गेलो होतो. त्याचे हातून समाजाची सेवा घडायची होती. आज तो पुन्हा ठणठणीत आहे. जगण्याबरोबर विचारांची लढाई लढत आहे. रमेश खरेतर माझा मित्र पर...
- Get link
- X
- Other Apps
कशी अवदसा आली ; माणूस माणसाला पारखा ! काल गोटूला (मनोज नेमाणे) फोन केला, त्याने सांगितले : भाऊ लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आजतागायत नांदगाव परिसरात २५-३० जणांचे नैसर्गिकरित्या वृद्धापकाळाने, जुनाट व्याधीने तर काहींचा हृदयविकाराने निधन झाले आहे. यात सर्व जातीधर्माचे होते. माणूस गेला की आपल्याकडे त्याला पोहचवायला गर्दी जमायची. आता तर घरचे जेमतेम १०-२० जणांच्या म्हणजे फक्त घरातील माणसात मूठमाती द्यावी लागत आहे. दारावर जाणेही अवघड झाले आहे. त्यांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, हे दुःख पेलण्याची शक्ती त्यांना नियंता देवो, हीच प्रार्थना ! माझा पत्रकार मित्र सुधीर रांगोळे याचे सुमारे १५ वर्षापूर्वी हृदयविकाराने अकाली निधन झाले. आमच्यासह अनेकजण शोकसागरात बुडालो. त्याच्या अंत्यविधीप्रसंगी तत्कालीन सकाळचे संपादक उत्तमराव कांबळे यांनी प्रातिनिधिक श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी ते म्हणाले, व्यक्तीचे आयुष्याचे मोजमाप त्याला शेवटी पोचवायला किती डोकी येतात त्यावर ठरते. उपस्थित जनसमुदाय पाहिल्यावर सुधीर किती जगला यापेक्षा सन्मानाने जगला हे महत्वाचे आहे. आज हा प्रसंग आठवण्याचे कारण असे की, लॉकडाऊनपासूनआजता...
- Get link
- X
- Other Apps
राजेंद्र रामभाऊ मोकळ हा आमच्या कुटुंबातील एक घटक. आमच्या सुख-दुःख यात त्याचे आख्खे कुटुंब सामील असते. राजुचे तसे शिक्षण जेमतेम. परंतु आकलन खूप चांगले. त्या जोरावर त्याने माजी आमदार अनिलदादा आहेर यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही काम केले आहे. त्याचा स्वभाव काहींना तापट वाटतो, परंतु त्याचे अंतर्मन मदतीसाठी कायम तत्पर असते. कोणीही सर्वांचे पूर्ण समाधान करु शकत नाही, त्याला राजू अपवाद असू शकत नाही. काहीवेळेस क्षमतेपेक्षा अपेक्षांचे ओझे अधिक होते, त्यावेळी मते मतांतरे असतात. राजू या चक्रव्यूहातून गेला आहे. आता तो त्याच्या विश्वात समाधानी आहे. त्याचा आज वाढदिवस. कुटुंबातील व्यक्तीचा वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष उपस्थित राहून अभिष्टचिंतन केले पाहिजे होते. आज लॉकडाऊनमुळे ते होऊ शकत नाही. सोशल नव्हेतर फिजिकल डिस्टन्स ठेवून त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहे, फोटोमात्र मागील वर्षाचा शेअर करीत आहे. राजूला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो, या मनःपूर्वक सदिच्छा ! - भास्कर कदम, माजी नगराध्यक्ष, नांदगाव.
- Get link
- X
- Other Apps
सुमितचे अभिष्टचिंतन ! सुमित सोनवणे, नुकताच मिसुरर्ड फुटू लागलेला महाविद्यालयीन विद्यार्थी. तेथेच खऱ्याअर्थाने एका सामाजिक कार्यकर्त्यांला धुमारे फुटले होते. सुमित पहिल्यांदा मला भेटला तेव्हाच मला त्याच्यात एक कार्यकर्ता दडलेला दिसून आला. चळवळीतील कार्यकर्ता अधिक धीट असतो. प्रश्नांबाबत तो आक्रमक असतो. सुमित मला आक्रमतेऐवजी प्रश्नांबद्दल तळमळ असलेला मवाळपंथी कार्यकर्ता जाणवला. आपल्यासोबत माणसे जोडण्याची त्याची कला मला उपजत असल्याचे दिसून आले. आपल्या वयाची तरुण मंडळी त्याने त्याच्या उपजत स्वभाव गुणधर्मानुसार जमवली होती. त्यांचेत मात्र त्याने शंभर टक्के समाजकारणाचे बीज रुजविले. आजचा तरुण दिशाहीन झालाय असे अलिकडे खूपदा ऐकले इतकेच नव्हेतर अनुभवले. परंतु सुमितची जडणघडण वेगळ्याच धाटणीची वाटली. सुमितने स्वतःबद्दलचा प्रामाणिक विश्वास इतरांत रुजविला. त्याशिवाय इतरजण सामाजिक कार्यासाठी सोबत येत नाही हा माझा अनुभव आहे. सुमितने आज समवयस्क तरुणांबरोबर ज्यांना सामाजिक कार्यात रस आहे अशांनाही एकत्र आणले आहे. त्याचं वय आज त्याच्या सोबत आहे. आज त्याचा वाढदिवस आहे त्याचे अभिष्टचिंतन करतांना मनात एक अनाम...
- Get link
- X
- Other Apps
पत्रकारितेतील ते मंतरलेले दिवस ! गोष्टच पाव शतकापूर्वीची आहे. आज नेमकी ही गोष्ट आठवण्याचे कारणही तसेच आहे. लोकमतच्या नाशिक आवृत्तीचा आज रौप्य महोत्सव आहे. याचबरोबर मित्रवर्य जयप्रकाश पवार यांचा वाढदिवस आहे. वृत्तपत्राला व मित्राला एकत्र शुभेच्छा देतांना मनस्वी आनंद होत आहे. यानिमित्त मन थोडे भूतकाळात डोकावले. या दोन्ही बाबत माझा निकटचा संबंध आहे. चार दशकातील पत्रकारितेतील एक दशक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत प्रतिनिधित्व केले. जयप्रकाश पवार यांचे बालपण व शिक्षण आमच्या नांदगाव येथे झाले. तसेच त्यांचा माझा खरा परिचय देशदूतमध्ये सुरेश अवधुतसाहेब यांच्यामुळे झाला. सोबतच पत्रकारिताही केली. आज लोकमत नाशिक आवृत्तीचा रौप्य महोत्सव आहे. नाशिक लोकमत जळगाव येथून छापून येत होता. धो. ज. गुरव संपादक होते. श्रीकांत बेणी जिल्हा प्रतिनिधी होते. त्यानंतर जबाबदारी किरण अग्रवाल यांचेकडे आली. नाशिक आवृत्तीला पूर्णत्व आले ते विजय बाविस्कर यांचेकाळात. सुरवातीला नाशिकला आवृत्ती छापू लागली तेव्हा दिलीप तिखले वैगरे सिनियर मंडळी संपादकीय विभागात होती. जेष्ठ संपादक मधुकर भावेसाहेब प्रत्यक्ष लक्ष ठेवून होते. न...